मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, पॅराग्लायडर्सवर बंदी
मुंबई, दि. 1 : मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 29 डिसेंबर 2020 पर्यंत ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट एअर क्राफ्ट, एरिएल मिसाईल आदी उपकरणांवर बंदी घालण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
मुंबई पोलीस उपआयुक्त (संचलन) तथा कार्यकारी दंडाधिकारी एस.चैतन्य यांनी उपरोक्त आदेश निर्गमित केले असून,या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध भा.द.वि. 1960 कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात म्हटले आहे.