BREAKING NEWS:
महाराष्ट्र

मुंबई जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी ८ जानेवारीपर्यंत अर्ज करावेत

Summary

मुंबई, दि. २४ : जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे आणि योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा, त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून जिल्हा क्रीडा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. सन २०१९-२० च्या मुंबई शहर जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी ८ जानेवारी […]

मुंबई, दि. २४ : जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे आणि योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा, त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून जिल्हा क्रीडा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. सन २०१९-२० च्या मुंबई शहर जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी ८ जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई शहर यांनी केले आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील पुरस्कारासाठी प्राप्त क्रीडा व खेळ प्रकारातील गुणवंत क्रीडापटू (एक पुरूष/ एक महिला व एक दिव्यांग खेळाडू),  गुणवंत मार्गदर्शक यांनी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा संकुल, २ रा मजला, सायन – वांद्रे लिंक रोड, धारावी बस डेपो शेजारी, धारावी, सायन (प), मुंबई येथून विनामुल्य प्राप्त करून घ्यावेत.

या पुरस्कारासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज ८ जानेवारी २०२१ पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर (दूरध्वनी क्रमांक ९८१९७०२०७०, ९७५७०१४५३७ येथे संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई शहर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *