महिलेला जिवंत जाळले.
नागपूर: मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या महिलेला भर
चौकात जिवंत जाळण्यात आले.ही थरारक घटना सदर
मधील अंजुमन पॉलटेकनिक कॉलेज जवळील हल्दीराम
समोर शुक्रवारी सायकाळी ७.३० वाजताच्या सुमारास
घडली भर चौकात घडलेल्या या घटनेने पोलिसांमध्ये
प्रचंड खळबळ उडाली .
शबाना अब्दुल जावेद (वय ४० रा.महेंद्रनगर ) असे मृतकाचे नाव आहे शबाना या अंजिनितील टाटा मोटर्स
येथे काम करीत होत्या .शुक्रवारी सायंकाळी कार्यालयातून काम आटोपून शबाना या मोपेडणे घरी जात होत्या सदर मधील हल्दीराम समोर एका तरुणी सोबत तरुण वाद घालत असल्याचे शबाना यांना दिसले.
त्यांनी मोपेड थाबवली त्या तरुणाला समजावण्यासाठी गेल्या .समजावीत असतानाच तरुण संतापला त्याने बाटलीतील पेट्रोल शबाना यांच्यावर फेकले .त्यानंतर तरुण तरुणीला घेऊन मोटर सायकल ने पसार झाला.शबाना यांना जळताना बगून नागरिकांनी धाव घेतली .पाणी टाकून आग विझवली नागरिकांनी शबाना
यांना खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल केले
उपचारा दरम्यान शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला सदर पोलिस सानी तूर्त आकस्मिक मृत्यूची नोद करून तपास सुरू केला.
स्वार्थी करमकर
महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर