महिला आर्थिक विकास महामंडळ( माविम) ने दिला ग्रामीण भागातील महिलांना रोजगार- श्री रामेश्वर सहारे
Summary
शंकरपूर- महिला आर्थिक विकास महामंडळ ( माविम) चंद्रपूर महाराष्ट्र शासन अंगीकृत कार्यालय चे वरिष्ठ जिल्हा समन्वयक अधिकारी श्री. नरेश उगेमुगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मानव विकास मिशन कार्यक्रम अंतर्गत मैत्री लोकसंचालीत साधन केंद्र शंकरपूर(भिसी) द्वारे तेजश्री फायनान्स सर्व्हिसेसच्या चेक चे वितरण […]
शंकरपूर- महिला आर्थिक विकास महामंडळ ( माविम) चंद्रपूर महाराष्ट्र शासन अंगीकृत कार्यालय चे वरिष्ठ जिल्हा समन्वयक अधिकारी श्री. नरेश उगेमुगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मानव विकास मिशन कार्यक्रम अंतर्गत मैत्री लोकसंचालीत साधन केंद्र शंकरपूर(भिसी) द्वारे तेजश्री फायनान्स सर्व्हिसेसच्या चेक चे वितरण करण्यात आले।या योजनेचा फायदा हिरापूर, कवडशी, खापरी, ईरव्हा येथील 65 महिलांना देण्यात आलेला आहे। महिला आर्थिक विकास महामंडळ( माविम) स्थापित मैत्री लोकसंचालीत साधन केंद्र शंकरपूर (भीसी) चे मॅनेजर श्री रामेश्वर वासुदेव सहारे यांच्या उपस्थितीत सदर चेक चे वितरण करण्यात आले। या योजनेत अतिशय गरीब व गरजू महिलांचे सर्वेक्षण करून त्यांना उद्योग व्यवसाय सुरू करण्याकरिता ग्रामीण भागातील महिला उद्योजक बनवाव्यात स्वतःच्या पायावर उभे राहाव्यात हाच मुख्य उद्देश आहे।या योजनेचा महिलांनी लाभ घेऊन पशुपालन ,कुकुटपालन, भाजीपाला , कापड उद्योग इत्यादी व्यवसाय सुरू केले आहेत त्या माध्यमातून त्यांना या कोविड 19 च्या या लॉकडाऊन काळात उत्पनाचे साधन तयार झाले आहेत। सदर योजना राबविताना व चेकचे वितरण करताना सहकार्याची महत्वाची भूमिका केंद्राचे सचिव जास्वंदा गाडगे कवडशी देश, लता हटोलकर हिरापूर सदस्य ,सुषमा ननावरे इरव्हा सदस्य,वनिता ननावरे खापरी सदस्य तसेच लेखापाल विशाल बंडे व क्षमता बांधणी सहयोगिनी सुचिता भिमराव मुनघाटे , उपजीविका सहयोगिनी ज्योत्स्ना कनिराम खोब्रागडे ,राधा ननावरे खापरी प्रेरक, सीमा गाडगे प्रेरक, प्रीती गजभे झरी प्रेरक व केंद्राचे मॅनेजर श्री रामेश्वर सहारे यांनी केली।तसेच
चांदा ते बांदा योजने अंतर्गत शंकरपूर (भीसी) क्षेत्रातील एकूण 13 गावातील जसे शंकरपूर, हिरापूर, खापरी, झरी, इरव्हा, चकजाटेपार, डोंगरगाव, डोंगरला, कवडशी देश, किटाडी,कपरला,आंबोली, चिंचाला शास्त्री,इत्यादी गावातील 100 महिलांना कुकुटपालन योजनेचा लाभ मिळवून देण्यात आलेला आहे।
नाव: रामेश्वर सहारे
गाव: शंकरपूर
तालुका: चिमूर
जिल्हा: चंद्रपूर
पद:तालुका प्रतिनिधी
7972256176,
9922579690