*महावितरण कंपनीच्या निषेर्धात कुरखेडा येथे भाजपाचे हल्ला बोल व ताला ठोको आंदोलन*
Summary
कुरखेडा. महावितरण कंपनीने विज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवुन राज्यातील जनतेला अंधारात टाकण्याचे पाप केले आहे. राज्यातील संवेदनाहीन महाविकास आघाडीने नागरिकांचा छळ चालविला आहे. लॉकडाऊनच्या काळात गरिब जनतेला अवाजवी रकमेची बिले पाठवुन आता त्यांचे कनेक्शन कापण्याचा घाट राज्य सरकारने घातला […]
कुरखेडा.
महावितरण कंपनीने विज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवुन राज्यातील जनतेला अंधारात टाकण्याचे पाप केले आहे. राज्यातील संवेदनाहीन महाविकास
आघाडीने नागरिकांचा छळ चालविला आहे. लॉकडाऊनच्या काळात गरिब जनतेला अवाजवी रकमेची बिले पाठवुन आता त्यांचे कनेक्शन कापण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे. याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीने कुरखेडा यांच्या वतीने आज दुपारी १ वाजता उपविभागीय अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण उपविभाग कार्यालय कुरखेडा येथे महाविकास आघाडी सरकारचा निषेध करून ताला ठोको आंदोलन करण्यात आले.महावितरण कंपनीच्या विरोधात हल्ला बोल व ताला ठोक आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात सर्व विज ग्राहकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होवुन राज्य सरकारच्या विरोधातील आपला असंतोष प्रकट केला.
या आंदोलनामध्ये भाजपा तालुका अध्यक्ष नाजुक पुराम, भाजयुमो जिल्हा अध्यक्ष चांगदेव भाऊ फाये, माजी नगराध्यक्ष तथा शहर अध्यक्ष रविंद्र गोटेफोडे, तालुका उपाध्यक्ष भाजपा तथा माजी नगरसेवक प्राध्यापक नागेश्वर फाये, अँड उमेश वालदे,खेमनाथ पाटील डोंगरावर, व्यंकटी नागीलवार,माजी नगरसेवक रामहरी उगले, जयश्रीताई मडावी, विनोद नागपूरकर,माजी नगरसेविका अर्चना वालदे,माजी नगरसेविका शारदा उईके, अनुसूचित जमाती महिला तालुका अध्यक्ष गौरी उईके, युवा मोर्चा तालुका सचिव साईनाथ कवाडकर, मोरेश्वर राऊत,रोषण कुंभलवार, तुषार कुथे, राहुल गिरडकर, मधूकरजी वारजुरकर, मंगेश मांडवे, जगदिश मानकर,सागर निरंकारी,सुखदेव कोरेटी ग्रामपंचायत सदस्य,गोकुलदास दुर्वे, पुष्पराज राहागडाले व कुरखेडा तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.