महाविकास आघाडीची सांगोला तालुक्यात जोरदार मुसंडी.! तब्बल 45 ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व
Summary
सांगोला : कोरोना काळात आणि अतिवृष्टीच्या परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांसाठी महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कार्याची जाणीव ठेवून सांगोला तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस अशा महाविकास आघाडीवर विश्वास ठेवून सांगोला तालुक्यातील 61 ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या उमेदवारांना […]
सांगोला : कोरोना काळात आणि अतिवृष्टीच्या परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांसाठी महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कार्याची जाणीव ठेवून सांगोला तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस अशा महाविकास आघाडीवर विश्वास ठेवून सांगोला तालुक्यातील 61 ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या उमेदवारांना भरभरून मतदान केले. 61 पैकी तब्बल 40 ते 45 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना प्रणित आघाडीने वर्चस्व राखले आहे.
वर्षानुवर्षे शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात असणाऱ्या अनेक ग्रामपंचायतीत आमदार शहाजीबापू पाटील व मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उमेदवारांनी सत्तांतर करून सुज्ञ मतदारांनी प्रस्थापित शेतकरी कामगार पक्षाला जबरदस्त धक्का दिला. अनेक ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे तर असंख्य ग्रामपंचायतीत आमदार शहाजीबापू पाटील यांच्या शिवसेना गटाला सोबत घेऊन ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवला आहे.
या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने सांगोला तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस हाच सर्वात प्रबळ राजकीय पक्ष असल्याचे मतदारांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी आपले राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आघाडीचे पॅनल किंवा उमेदवार विजयी झाल्याचे समजताच सांगोला शहरात गुलालाची मुक्त उधळण करून आनंद साजरा केला. यावेळी राष्ट्रवादी भवन सांगोला येथे हजारो कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन राष्ट्रवादीचे राज्याचे उपाध्यक्ष मा.आ. दिपकआबा साळुंखे पाटील यांना खांद्यावर उचलून पारंपारिक हलग्यांच्या गगनभेदी निनादात विजयोत्सव साजरा केला.
यावेळी जवळा, कडलास, अकोला, आलेगाव, मेडशिंगी, पारे, हंगिरगे, डिकसळ, अचकदाणी, हलदहिवडी, एखतपूर, लक्ष्मीनगर, संगेवाडी, अजनाळे, यलमार मंगेवाडी, यासह ज्या गावात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना प्रणित आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत अशा अनेक गावातून राष्ट्रवादी भवन सांगोला येथे हजारो कार्यकर्ते उपस्थित राहिले होते. यावेळी जिल्ह्याचे महाविकास आघाडीचे नेते व राष्ट्रवादीचे राज्याचे उपाध्यक्ष मा.आ. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांना आगामी काळात गावाच्या विकासासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांना सोबत घेऊन सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
तसेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून सामान्य नागरिकांसाठी केलेल्या प्रामाणिक कार्यावर जनतेने विश्वास ठेवून महाविकास आघाडीच्या विचारांच्या उमेदवारांना गावाचा कारभार करण्याची संधी दिली आहे. या संधीचे सर्वांनी सोने करावे काम करताना कुठेही कसलीही अडचण आल्यास आमदार शहाजीबापू पाटील व माझ्याशी थेट संपर्क करावा असेही शेवटी मा.आ.दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी सर्व विजयी उमेदवारांना सांगितले
सचिन सावंत शेलेवाडी
(मंगळवेढा) सोलापूर
9370342750
पोलिस योद्धा न्युज नेटवर्क