महाराष्ट्र शासनाचा निर्णय आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा
Summary
covid-19 च्या पार्श्वभूमीवर आदरतिथ्य क्षेत्राचे पुनरुज्जीवन व पर्यटकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आदरातिथ्य क्षेत्राला औद्योगिक दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. यानुसार प्रथम टप्प्यात केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाकडे नोंदणीकृत असलेल्या हॉटेल व्यवसाय […]
covid-19 च्या पार्श्वभूमीवर आदरतिथ्य क्षेत्राचे पुनरुज्जीवन व पर्यटकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आदरातिथ्य क्षेत्राला औद्योगिक दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
यानुसार प्रथम टप्प्यात केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाकडे नोंदणीकृत असलेल्या हॉटेल व्यवसाय कडून एक एप्रिल 2021 पासून वीज दर, वीज शुल्क, पाणीपट्टी, मालमत्ता कर व अकृषी कराची आकारणी औद्योगिक दराने करण्याचा निर्णय घेण्यात आला.
केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाकडे नोंदणीकृत असलेल्या हॉटेल व्यवसाय काकडून औद्योगिक दराने कर शुल्क आकारणी करण्याकरिता, निकस विरहित करण्याकरिता एक तज्ञ समिती नेमून निकष निश्चित करण्यात येईल त्यानंतर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया राबवून निकषाची पूर्तता करणाऱ्या हॉटेल व्यवसायिकांना औद्योगिक दराने कर शुल्क लागू करण्यात येईल. सरकारच्या या निर्णयामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गडचिरोली
जिल्हा प्रतिनिधी
प्रा. शेषराव येलेकर