महाराष्ट्रात आजपासून आठवड्यातील 4 दिवस कोरोना लसीकरण!
👨⚕ महाराष्ट्रात आजपासून (19 जानेवारी) आठवड्यातील 4 दिवस लसीकरण मोहीम राबवली जाईल. कोरोना लसीकरणाचा आढावा काल (18 जानेवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला.
🗣️ मुख्यमंत्र्यांनी केलं आवाहन..
▪️ आठवड्यातील मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी अशा 4 दिवशी राज्यातील 285 केंद्रांवर कोरोना लसीकरण मोहीम राबवून आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
▪️ कोविन ॲपची कार्यपद्धती अधिक गतिमान होण्याकरिता काही जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या. त्या केंद्र शासनाला पाठविण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
▪️ जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस टोचून घ्यावी. जेणेकरुन समाजामध्ये सकारात्मक संदेश जाण्यास मदत होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
▪️ लसीकरणामध्ये 2 डोस घेतल्यानंतर 14 दिवसांनी रोग प्रतिकारक क्षमता तयार होते. त्यामुळे लसीकरणानंतरही कोरोना प्रतिबंधासाठी जे नियम आहेत त्याचे सर्वांनी पालन करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
📍 “कोविन ॲपवर ज्यांची नोंदणी होईल त्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे. या दरम्यान एखाद्याला लस घेतल्यानंतर ताप, स्नायू दुखी यासारखे प्रतिकुल परिणाम जाणवल्यास त्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि उपचार करा,” अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर