BREAKING NEWS:
महाराष्ट्र

*महाज्योती तर्फे आयोजित विविध परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी* *आत्तापर्यंत केवळ ६हजार अर्ज प्राप्त* *नोंदणीसाठी शेवटची तारीख 30 जानेवारी* *उत्पन्नाच्या दाखल्याची अट नाही. फक्त नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र आवश्यक* *मोठ्या संख्येने नोंदणी करण्याचे महाज्योती चे संचालक डॉ. बबन तायवाडे यांचे आव्हान*

Summary

राज्यात ५२ टक्क्याहून अधिक इतर मागासवर्गीय (ओबीसी) असतानाही एमएच-सीईटी/ जेईई/ नीट परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी विद्यार्थ्यांची वानवा आहे. ओबीसी, एन टी, व्ही जे, एसबीसी या प्रवर्गातून दिलेल्या मुदतीत राज्यातून केवळ ६ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व […]

राज्यात ५२ टक्क्याहून अधिक इतर मागासवर्गीय (ओबीसी) असतानाही एमएच-सीईटी/ जेईई/ नीट परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी विद्यार्थ्यांची वानवा आहे. ओबीसी, एन टी, व्ही जे, एसबीसी या प्रवर्गातून दिलेल्या मुदतीत राज्यातून केवळ ६ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था( महाज्योती) कडून 30 जानेवारीपर्यंत नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्य शासनाने ओबीसीसाठी महा ज्योती या स्वायत्त संस्थेचे कार्यालय नागपूर येथे सुरू केले आहे. सर्वप्रथम ओबीसी, एनटी, व्हीजे, एसबीसी, विद्यार्थ्यांसाठी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. बारावीनंतर वैद्यकीय अभियांत्रिकी अश्या व इतर महत्त्वाच्या शासकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जेईई, एमएच-सीईटी, नीट परीक्षा द्यावी लागते. ओबीसी विद्यार्थ्यांना यासाठी महागडी शिकवणी परवडणे शक्य नाही म्हणून महाज्योतीने 2022 मध्ये होणाऱ्या या परीक्षेसाठी ओबीसींच्या १० हजार विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्याचा व त्यांची या स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करून घेण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी इयत्ता ११ विज्ञान शाखेत शिकणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना महाज्योती च्या संकेतस्थळावर जानेवारी 30 पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन महाज्योती चे संचालक डॉ बबन तायवाडे यांनी केले आहे. या प्रशिक्षणासाठी उत्पन्नाच्या दाखल्याची अट नसून फक्त नान क्रिमीलेअर प्रमाणपत्र आवश्यक आहे.
निवडलेल्या दहा हजार पात्र विद्यार्थ्यांना शासनाकडून महाज्योतीला निधी प्राप्त झाल्यानंतर मोफत टॅब, स्पर्धा परीक्षांची पुस्तके , शैक्षणिक साहित्य व इतर सर्व मदत देण्याची योजना आहे.

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी प्रा शेषराव येलेकर

5 thoughts on “*महाज्योती तर्फे आयोजित विविध परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी* *आत्तापर्यंत केवळ ६हजार अर्ज प्राप्त* *नोंदणीसाठी शेवटची तारीख 30 जानेवारी* *उत्पन्नाच्या दाखल्याची अट नाही. फक्त नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र आवश्यक* *मोठ्या संख्येने नोंदणी करण्याचे महाज्योती चे संचालक डॉ. बबन तायवाडे यांचे आव्हान*
  1. I am studying in 11th science in Jeevan Vikas Vidyalay. I scored 93.80% in ssc board exam. I want to become engineer so I should prepare for JEE and I will. So that I fill this form.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *