महत्वपुर्ण विषयाला नामंजुर करण्या चे नगरसेवकानी स्पष्टीकरण द्यावे- नगराध्यक्षा आष्टनकर
Summary
नागपूर – नगरपरिषद कन्हान-पिपरी च्या ऑनलाईन विशेष सभेत महत्वपुर्ण सात पैकी पाच विषयाना नगरसेवकांनी नामंजुर केल्याने नागरिकांनी विकास कामाकरिता आपण सगळयाना विश्वास दाखविल्याने नगरसेवकांनी महत्वपुर्ण विषयाला नामंजुर करण्याचे स्पष्टीकरण सादर करावे. असे नगराध्यक्षा करूणा ताई आष्टनकर हयानी प्रसिध्दी पत्रकातून म्हटले […]
नागपूर – नगरपरिषद कन्हान-पिपरी च्या ऑनलाईन विशेष सभेत महत्वपुर्ण सात पैकी पाच विषयाना नगरसेवकांनी नामंजुर केल्याने नागरिकांनी विकास कामाकरिता आपण सगळयाना विश्वास दाखविल्याने नगरसेवकांनी महत्वपुर्ण विषयाला नामंजुर करण्याचे स्पष्टीकरण सादर करावे. असे नगराध्यक्षा करूणा ताई आष्टनकर हयानी प्रसिध्दी पत्रकातून म्हटले आहे.
मंगळवार दिनांक १३/१०/२०२० ला दुपारी १२ वाजता आॅनलाईन विशेष सभा नगराध्यक्षा करूणाताई आष्टनकर यांच्या अध्यक्षेत घेण्यात आली होती. सभेत घनकचरा, व्यवस्थापन, पाणी पुरवठा, जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत पांधन रस्ते, आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत विविध कामे, जनसुविधा केंन्द्राची जागा बदलविणे, सार्वजनिक शौचालयाची जा गा बदलविणे, ट्युबवेल खोदकाम करणे , अश्या सात विषयावर विशेष सभा घे ण्यात आली. या सात विषया पैकी दोन विषय मंजुर करण्यात आले तर पाच वि षय नामंजुर करण्यात आले. विषय क्र. १ घनकचरा व्यवस्थापन मध्ये कंत्राटदार श्री साई अभियंता बेरोजगार सेवा संस्था चंद्रपुर यांचा कंत्राट २६ टक्के कमी अस ल्यामुळे कंत्राटदारांना या बद्द्ल दि ०७/ ०८/२०२० ला स्पष्टीकरण विचारण्यात आले होते. त्या अनुषंगाने त्यांनी स्पष्टी करण सादर करुन कामे करताना होणा रे नुकसान आमची संस्था सहन करू शकते असे कंत्राटदारांनी सांगितले. या प्राप्त दराला सभेची मंजुरीकरिता सादर करण्यात आले होते. परंतु कोव्हिड १९ चा प्रादुर्भाव असतांना विपक्ष व सत्तापक्ष यांनी विषयाला नामंजुरी दिल्याने शहरा तील साफ सफाई, कचरा संकलन, घंटा गाड़ी द्वारे सुखा कचरा व गिला कचरा सहित इतर ठरवुन दिलेले स्वच्छतेचे का मे कसे होणार हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी पुरवठा योजना २४ × ७ चालविण्याकरिता २०२०-२१ या आर्थिक वर्षात कन्हान-पिपरी शहराची नळ योजना चालविणे, सार्वजनिक विहि रीतुन पाणी वितरण व्यवस्थापन, पाईप लाईन साहित्य सहित मनुष्यबळासह दे खभाल दुरुस्ती निवृत्ति करणे, टॅंकर द्वारे पाणी पुरवठा करणे, या विषयाला प्रशा सकीय विशेष सभेत पुढे ठेवण्यात आले. शहराच्या जनहितार्थ हे दोनही विषय अंत्यत गरजेचे होते पण विपक्ष व सत्ता पक्ष यांनी या दोन्ही विषयाला नामंजुरी दिली. मला कन्हान शहराच्या नागरिकां नी विश्वास दाखवित जनहितार्थ अधिका र दिल्याने मी शहरवासीयांच्या हिताकरि ता काम करणार यामुळे जनतेच्या हिता र्थ असलेले दोनही महत्त्वपुर्ण विषयाला नामंजुरी का बर दिली. नामंजुर करणा-र्या नगरसेवकांनी आपले स्पष्टीकरण लि खित स्वरूपात द्यावे. असे कन्हान नगरा ध्यक्षा करूणा आष्टनकर यांनी प्रसिध्दी पत्रका व्दारे म्हटले आहे.
✍🏼संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज चॅनल
9579998535