मंगळवेढा शहरालगत च्या दोन ग्रामपंचायती नगरपालिकेत होणार विलीन ?
Summary
मंगळवेढा (सोलापूर): नगरपालिकेच्या हद्दवाढीच्या प्रस्तावावर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगर विकास सचिवांना दिली . यामुळे मंगळवेढा शहरालगतच्या दोन मोठ्या ग्रामपंचायती सह इतर लोकवस्ती नगरपालिकेत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात राष्ट्रवादी चे माजी शहराध्यक्ष सोमनाथ […]
मंगळवेढा (सोलापूर): नगरपालिकेच्या हद्दवाढीच्या प्रस्तावावर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगर विकास सचिवांना दिली .
यामुळे मंगळवेढा शहरालगतच्या दोन मोठ्या ग्रामपंचायती सह इतर लोकवस्ती नगरपालिकेत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात राष्ट्रवादी चे माजी शहराध्यक्ष सोमनाथ माळी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्याबाबत चे निवेदन देत त्यांच्याशी चर्चा केली.
दिवंगत आमदार भारत भालके यांनी चोखामेळा नगर व दामाजी नगर या दोन स्वतंत्र ग्रामपंचायती
अस्तित्वात आणल्या.
परंतु या दोन ग्रामपंचायतीना पाणी व इतर काही सुविधा साठी नगरपालिकेवर अवलंबून रहावे लागत आहे. नगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागात असलेल्या कर्मचार्यांच्या माध्यमातून या दोन ग्रामपंचायती ची स्वच्छता व इतर गोष्टी करणे पालिकेला शक्य होते.शिवाय या दोन ग्रामपंचायती मधील बहुसंख्य मिळकत धारक आर्थिक दृष्ट्या संपन्न होते.परंतु ते ग्रामपंचायती कडे विलीन झाल्यामुळे त्यांच्या पासून मिळणारे नगरपालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते.
सध्या या दोन ग्रामपंचायती सह अकोला रस्ता लगत असलेली जय भवानी काॅलनी शरद काॅलनी . डॉ बाबासाहेब आंबेडकर काॅलनी एकविरा माळ या भागात जवळपास 14 हजारांपेक्षा अधिक लोक संख्या आहे हा भाग नगरपालिकेत समाविष्ट झाल्यास नगरपालिकेला त्यांच्याकडून कर रूपाने उत्पन्न मिळणार असून त्यांना नगरपालिकेच्या माध्यमातून आरोग्य दिवाबत्ती व इतर सुविधा विकासाच्या योजनेचा लाभ देणे देखील शक्य होणार आहे. त्या दृष्टीने नगरविकास सचिव यांना या बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ सुचना दिल्या आहेत.
याशिवाय शहरांमध्ये भुयारी गटार योजना राबविण्यासाठी 42 कोटी 50 लाखांच्या प्रस्तावावर लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितल्याची माहिती सोमनाथ माळी यांनी दिली..
सचिन सावंत शेलेवाडी (मंगळवेढा) सोलापूर
पोलिस योद्धा न्युज नेटवर्क