BREAKING NEWS:
महाराष्ट्र

मंगळवेढा ब्रेकिंग! इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी उतरली रस्तावर

Summary

मंगळवेढा: संपुर्ण जगभरात कोरोना रोगाचे थैमान माजलं असताना केंद्र सरकार मनमानी कारभार करून सामान्य जनतेला अजुन जास्त अडचणी आणण्याचं कुटील डाव आखत आहे . शेतकरी हिताचे विरोधी कायदा असो किंवा इंधन दरवाढ असे अनेक सामान्य जनसामान्यांचे जिवन शैलीच्या विरोधात जाचक […]

मंगळवेढा: संपुर्ण जगभरात कोरोना रोगाचे थैमान माजलं असताना केंद्र सरकार मनमानी कारभार करून सामान्य जनतेला अजुन जास्त अडचणी आणण्याचं कुटील डाव आखत आहे .

शेतकरी हिताचे विरोधी कायदा असो किंवा इंधन दरवाढ असे अनेक सामान्य जनसामान्यांचे जिवन शैलीच्या विरोधात जाचक असे निर्णय घेत आहेत .

गेल्या 10 महिन्यांपासून कोरोना सारख्या महामारी परिस्थितीत अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. व्यापार धंद्यावर गदा आली आहे. कामगारांच्या हाताला काम नाही कित्येकावर उपास मारीची वेळ आली आहे..

अशातच केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर इंधन दरवाढ केली आहे याचा जनसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं आहे. म्हणून केंद्र सरकारचा निषेध मंगळवेढा शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने नोंदवत आहे.

त्यामुळे केंद्र सरकारने घेतलेल्या इंधन दरवाढ निर्णय मागे घ्यावा व सामान्य जनतेला होणारा आर्थिक टंचाईचा त्रास कमी करावा यासाठी प्रांताधिकारी उदयसिंह मोहिते यांना निवेदन देण्यात आले ..

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेल पश्चिम महाराष्ट्र प्रभारी लतीफभाई तांबोळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग प्रदेश सचिव विजयकुमार खवतोडे नगरपरिषद मंगळवेढा पक्षनेते अजित जगताप राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष मुझ्जमिल काझी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष संदीप बुरकुल पदवीधर संघाचे संतोष नागणे पदवीधर शहराध्यक्ष तुषार हजारे संभाजी ब्रिगेड चे संदीप फडतरे सागर केसरे विनायक दत्तु मनोज माळी प्रसिद्धी प्रमुख अशोक माने आफताब घोडके जमीर इनामदार. आदी उपस्थित होते

सचिन सावंत शेलेवाडी
(मंगळवेढा) सोलापूर
9370342750
पोलिस योद्धा न्युज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *