भारतीय बौद्ध महासभा कन्हान व्दारे शौर्य दिवस साजरा
नागपूर कन्हान : – भारतीय बौध्द महासभा कन्हान व़्दारे डॉ बाबासाहेब आबेंडकर चौक कन्हान येथे क्रांती मशाल ज्योत प्रज्वलित करून वीर सैनिकाना मानवंदना देऊन शौर्य दिवस साजरा करण्यात आला.
१ जानेवारी १८१८ ला भीमा कोरेगाव येथे पेशवाई व्यवस्थेच्या विरूध्द ऐतिहासिक विद्रॊह करून ५०० महार वीर सैनिकांनी लढा देत बंड केला होता. या ऐतिहासिक दिना निमित्य १ जानेवारी ला बाबासाहेब आबेंडकर चौक कन्हान येथे डॉ. बाबासाहेबां च्या पुतळया जवळ तिरंगा व निळया ध्वजा सामोर अखंड क्रांती ज्योतीची मशाल दुपारी १ वाजता महार रेजिमेंट चे जवान विलास मेश्राम व जय पाटील यांनी परेड (ड्रीर) करून क्रांती मशाल ची ज्योत प्रज्वलित करून महार बटालियन यश सिद्धी स्मृती चिन्हास (बिनन परि श्राम यश) ला पुष्पचक्र अर्पित करित ५०० शुर वीर सैनिकोंना सामूहिक बुद्ध वंदना व दो मिनट सामुहिक मौनधारण करून मानवंदना देण्यात आली. क्रांती मशाल ची अखंड ज्योत १२ तास अविरत प्रज्वलित ठेवुन समता, बंधुत्व, न्याय, एकता आणि अनेकतात अखंडता राखण्यास समर्पित करून शौर्य दिवस साजरा करण्यात आला.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535