भाजप बुथ कमिटी सभा येळसे गावात पार पडली

मावळ – मावळ तालुका हा भाजपाचा किल्ला म्हणून ओळखला जायचा. पण मागील काही निवडणुकीत कमी जागेवर समाधान मानावे लागले.
त्यामुळे किल्ला राखण्यासाठी मावळातील गावोगावी भाजप बुथ कमिटीसभा घेण्यात सुरूवात केली आहे.
या वेळी अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग ठाकर (सर) , उद्योजक, सरपंच मुकुंद ठाकर, आर.पि.आय माजी अध्यक्ष अर्जुन घोडके, माजी सरपंच शिवाजी सुतार, पत्रकार सुभाष भरते, पत्रकार ज्ञानेश्वर ठाकर, उद्योजक किसन आडकर मावळ तालुका भाजप विद्यार्थी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे उपस्थित होते.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून सांगीतले कि युवकांनी पुढे येवून काम केले पाहिजे. सर्वाच्या उपस्थित येळसे बुथ कमिटीवर काही पदे देण्यात आली.
संचालक पांडुरंग ठाकर यांनी मावळातील भारतीय जनता पक्षाच्या १९८५ सालापासूनचा आतापर्यंतच्या प्रवासा बद्दल वक्तव्य केले, त्यानंतर अभिमन्यू शिंदे यांनी भाषण करून पद मिळणाऱ्या युवकांचा सन्मान केला गेला. युवकांनी आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे आणि त्या बरोबर समाज कार्य केले पाहिजे हा मोलाचा संदेश देण्यात तरूण पिढीला देण्यात आला.