ब्रेकिंग : पत्रकार भवनासमोरच बंदूक दाखवून दहशत दाखविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी केली अटक.
चंद्रपूर : आज दुपारी २ वाजताच्या सुमारास चंद्रपूर शहरांमधील वर्दळीच्या ठिकाणी व मुख्य म्हणजे वरोरा नाका येथील पत्रकार भवन समोर एक तरुण फिल्मी स्टाईलने गाडीतून उतरला व त्या ठिकाणी उभ्या असलेल्या तीन चार तरुणांना आपल्या कंबरे मध्ये असलेली बन्दुक काढून दम देण्याचा प्रयत्न करीत होता.
त्याचवेळी तिथून युवा स्वाभिमान पार्टी चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष श्री. सूरज ठाकरे व त्यांच्यासोबत निखील बजाइत व राहुल चव्हाण हे जात असताना त्यांनी हा प्रकार बघितला व तात्काळ बंदूक असलेल्या तरुणाच्या दिशेने धाव घेतली व त्या तरुणाला पकडले व लगेच रामनगर पोलिस स्टेशन ला सूचना दिली. दहा ते पंधरा मिनिटाच्या आत मध्ये पोलिसांचा ताफा याठिकाणी आला व सदर तरुण व त्यासोबत वाद घालत असलेला तरुण याला व त्याच्या जवळ असलेल्या बंदूककिला घेऊन पोलिस स्टेशनला पुढील तपासा करता घेऊन गेले.
बंदूक दाखविणारा तरुण हा ती बंदूक खरी नसून छर्याची आहे व मी इंदोर वरून विकत घेतली आहे असे सांगत होता. काय खरे काय खोटे हे पोलीस तपासामध्ये निष्पन्न होईल.
सदर तरुणाने उधारीचे पैसे परत करण्याकरता सतत तगादा लावल्याने दम देण्याकरता घेऊन फिरत होता. सदर वादग्रस्त बंदूक घेऊन धमकावण्याकरिता आणली असल्याचे समजते परंतु जर कुठल्याही प्रकारे अनर्थ घडला असता अथवा ज्या तरुण वर्गाने बंदूक उगारली तो तरुण भीतीपोटी हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावला असता तर खूप मोठा अनर्थ घडला असता, हा अनर्थ युवा स्वाभिमान पक्षाच्या जिल्हाध्यक्ष व त्यांच्या सहकार्यामुळे टळला अशी सर्वत्र चर्चा आहे व आपला जीव धोक्यात घालून कुठलाही विचार न करता अशा प्रकरणांमध्ये मदतीला धाव घेणे हे धाडस सहसा कोणी करीत नाही. सुदैवाने ती बंदूक छर्याची निघाली परंतु जर बंदूक खरी असती तर निश्चितच मोठा अनर्थ घडला असता.
विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर