*बोरडा शेत शिवारातुन शंभर धानाचे बोरे चोरी*
नागपूर कन्हान : – शहरापासुन आठ किलोमीटर अंतरावरील बोरडा (गणेशी) गावाच्या शेत शिवारातुन शेतकरी अंकुश घनश्याम बादुले यांच्या शेतात असलेले ११५ धानाच्या बो-या पैकी अज्ञात चोरानी वाहनात भरून शंभर धानाचे बोरे किंमत २ लाख ५०हजार रूपयांचे रात्री चोरून नेले.
शेतकरी अंकुश घनश्याम बादुले वय ५६ वर्ष रा.स्वामी विवेकानंदन नगर कन्हान यांचे मालकीचे शेत बोरडा (गणेशी) गावाच्या शेत शिवारत शेत असुन शेतातील धान पिक स्थानिक मजुरां कडुन कापुन मळणी करून शेतात ११५ बोरे धान भरून ठेवलेले असताना दि.१९ ते २० च्या मध्यरात्री १२ ते पहाटे सकाळी ५ वाजे दरम्यान अज्ञात आरोपीनी मोठया वाहनात १०० बोरे धान भरून चोरून नेले. सकाळी अंकुश घनश्याम बादुले हे शेतात गेल्यावर शंभर धान बो-याची चोरी झाल्याचे समजताच कन्हान पोलीस स्टेशनला माहीती दिली असता पोलीसानी घटनास्थ ळी धाव घेत फिर्यादी अकुंश बादुले यांच्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरूदध कलम ३७९ भादंवि नुसार गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक अरूण त्रिपाठी यांचा मार्गदर्शनात पुढील तपास कन्हान पोलीस करीत आहे.
✍🏼संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535