बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतीची पालकमंत्र्यांकडून पाहणी
Summary
नंदुरबार दि.5: राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांनी नंदुरबार तालुक्यातील चौपाळे शिवारातील शेतात गुलाबी बोंडअळी प्रादुर्भाव असलेल्या कापूस पिकाची पाहणी केली. यावेळी माजी मंत्री पद्माकर वळवी, समाज कल्याण सभापती रतन पाडवी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत […]
नंदुरबार दि.5: राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांनी नंदुरबार तालुक्यातील चौपाळे शिवारातील शेतात गुलाबी बोंडअळी प्रादुर्भाव असलेल्या कापूस पिकाची पाहणी केली.
यावेळी माजी मंत्री पद्माकर वळवी, समाज कल्याण सभापती रतन पाडवी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, उपविभागीय कृर्षी अधिकारी निलेश भागेश्वर, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.एस.बी.खरबडे तालुका कृर्षी अधिकारी आर.एम.पवार, मंडळ कृर्षी अधिकारी आर.सी.हिरे उपस्थित होते.
निसर्गाच्या लहरीपणामुळे यावर्षी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव जिल्ह्यात दिसून येत असल्याने गुलाबी बोंडअळी प्रादुर्भाव झालेल्या शेतीचे सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी करावे, असे निर्देश ॲड.पाडवी यांनी दिले. त्यांनी शेतकऱ्यांना गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी फेरोमोन सापळे तसेच किटकनाशकांची फवारणी करण्याच्या सूचनाही दिल्या. संकट काळात शासन शेतकऱ्यांसोबत असल्याचे त्यांनी सांगितले.
संकलन
अमर वासनिक
न्यूज एडिटर
7774980491