पिटेसुर येथे गोंड – गोवारी समाज संघटने मार्फत ११४ गोवारी शहीद बांधवांना श्रद्धांजली.
गोंड – गोवारी ही महाराष्ट्रात ना स्वतंत्र जमात अस्तित्वात आहे .ना ती गोंड जमातीची उपजमात आहे.गोंड गोवारी
असे संबोधले जाणारे सर्वजण मुळ गोवारीच आहेत.गोंड आणि गोवारी या दोन भिन्न जमाती आहेत.आणि गोंडा प्रमाणे गोवारीदेखिल आदिवासीच आहेत.त्यामुळे गोवारी
ना अनुसूचित जमातीचे लाभ नाकारले जाऊ सकतनाही.
गोवारी समाजाच्या न्याय मागणीसाठी २६ वर्षापूर्वी नागपूर विधानसभेवर काढण्यात आलेल्या मोर्चा वर गोळीबार झाल्याने त्यामध्ये ११४ गोवारी बांधव शहीद झाले .त्यांची आठवण नेहमी समाजबांधवांच्या मनात राहावी म्हणून २९ नोव्हेंबर २०२० ला पिठेसुर येथे सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.या प्रसंगी अध्यक्ष पदावर विराजित माजी सैनिक कार्यालय जिल्हा वर्धा सघटक जागेस्वर जी कोहळे यांनी आपली उपस्थिती दर्शवली .
प्रमुख पाहुणे म्हणून मा.गुरुदेव जी भोंडे पंचायत समिती सदस्य तुमसर , मा.भाऊराव जी शेंद्रे आदिवासी गोंड गोवारी समाजाचे अध्यक्ष तालुका तुमसर मा. सहा देव जी राऊत माजी पंचायत समिती सदस्य , मा.दिलीप जी वा घाडे उपसरपंच पाथरी, मा.देवराव जी भोंडे सरपंच रोघा , ज्योती ताई आंबडारे, सुनंदा ताई नेवारे , डॉ.रामदास जी भोंडे ,शिवा भाऊ शेंद्रे , बलधारी नेवारे, हिरा भाऊ ,नरेंद्र नेवारे ,गुरुदेव राऊत हमेश्या, प्रकाश कोहळे आलेसुर ,अशोक जी राऊत ,माचिंद्र राऊत ,श्री दसरत सरोवरे ,श्री सदानंद राऊत ग्राम पंचायत सदस्य
बाबुराव राऊत, रोशन राऊत, व समस्त ग्राम वाशी उपस्थित होते.
स्वार्थी करमकर
महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर