“पाणी अडवा, पाणी जिरवा.” अंतर्गत श्रमदानाने साटक शेत शिवारात दोन वनराई बंधारे बांधले.
नागपूर कन्हान : – कृषी विभाग पारशिवनी तालुका व ग्राम स्थ शेतक-यांच्या सयुक्त विद्यमाने साटक शेतशिवारा तील लेंडीनाला व हिवरा साटक नाल्यावर असे दोन वनराई बंधारे चे लोकसहभागातुन उभारण्यात आल्या ने परिसरातील शेतक-यांना शेती करिता लाभ होईल.
“पाणी अडवा, पाणी जिरवा.” योजना २०२०-२१ अंतर्गत कृषी विभाग पारशिवनी तालुका व ग्रामस्थ शेतक-यांच्या सयुक्त विद्यमाने गुरूवार (दि.१७) ला साटक येथील श्री किसन बापुराव हिंगे यांचे शेता लगत लेंडी नाल्यावर आणि हिवरा साटक नाल्यावर असे दोन लोकसहभागाने श्रमदानातुन वनराई बंधारे बांधण्यात आले. या बंधाऱ्यामुळे पावसाळ्यानंतर नाल्यातुन वाहूुन जाणारे पाणी पारंपारिक पद्धतीने अडवून ते पाणी जमिनीत जिरविण्यासाठी मदत होई ल. वनराई बंधाऱ्यात साठलेल्या पाण्याने जवळपास च्या शिवारातील भूजल पातळी वाढूुन तलाव, विहिरी त जल पातळी वाढण्यास मदत होईल आणि सदर नाल्यालगत असलेल्या शेतकऱ्यांना पर्यायी सिंचनाची व्यवस्था होईल या हेतूने बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली. यामुळे साटक शेतशिवारातील २० ते २५ शेत क-यांच्या अंदाजे ६० ते ७५ एकर शेती करिता सिंचना चा शेतक-यांना लाभ होईल. याप्रसंगी साटक सरपंचा सौ सिमाताई यशवंतराव उकुंडे, उपसरपंच गजाननजी वांढरे, मंडळ कृषी अधिकारी कन्हान श्री. जी बी वाघ , कृषी सहायक भालेराव, क्रिष्णा ठोंबरे, देशमुख, साठे , कु ढंगारे, कु राठोड, ग्रा प सदस्य तरूण बर्वे, नारायण कुंभलकर, मंगेश हिंगे, राजु चोपकर, आत्माराम उकुंडे , मंगेश भुते, रविंद्र गुडधे, रोशन चामट, रमेश वांढरे, उमेश भुते, अरूण लोंडे सह इतर ग्रामस्थ शेतक-यांनी श्रमदान करित सहकार्य केले.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535