धानाला प्रती क्विंटल 3 हजार रुपये भाव द्या देसाईगंज तालुका काॅग्रेसच्या वतिने केन्द्रीय कृषी मंञ्यांना निवेदन
Summary
देसाईगंज-ता.प्र:- नैसर्गिक आपत्तीचा वेळोवेळी फटका बसत असल्याने शेतकरी देशोधडीला लागला असतानाच केन्द्र शासनाने जाहीर केलेल्या धानाचे हमी भाव म्हणजे शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. राज्य शासनाने बोनस देणे बंद केल्यास वर्तमान स्थितीत शेतक-यांची अवस्था ना घरका ना घाटका होण्याची […]
देसाईगंज-ता.प्र:-
नैसर्गिक आपत्तीचा वेळोवेळी फटका बसत असल्याने शेतकरी देशोधडीला लागला असतानाच केन्द्र शासनाने जाहीर केलेल्या धानाचे हमी भाव म्हणजे शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. राज्य शासनाने बोनस देणे बंद केल्यास वर्तमान स्थितीत शेतक-यांची अवस्था ना घरका ना घाटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यास्तव केन्द्र शासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन धानाला प्रति क्विंटल 3 हजार रुपये भाव देण्याची मागणी माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या नेतृत्वात देसाईगंज तालुका काॅग्रेसच्या वतिने केन्द्रीय कृषी मंत्री ना.नरेंद्रसिंह तोमर यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की शेतमालाचे भाव ठरविण्याचा संपुर्ण अधिकार केंन्द्र शासनाचा असुन यावर्षी केन्द्र शासनाने जाहीर केलेल्या धानाच्या हमीभावात फक्त 53 रूपयाची वाढ केली आहे.मागील वर्षी केन्द्र शासनाने जाहीर केलेल्या हमी भावा प्रमाणे शेतक-यांना 1815 रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात आला असला तरी राज्य शासनाने त्यात 700 रुपये प्रति क्विंटल बोनसची भर घातल्याने शेतक-यांना 2518 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाल्याने काही अंशी शेतकरी तग धरु शकला आहे.
नैसर्गिक आपत्तीने शेतक-यांचे वेळोवेळी होत असलेले प्रचंड नुकसान,कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ, मावा तुडतुडा व इतरही रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पन्नात येत असलेली प्रचंड घट व उत्पादन खर्चात झालेली प्रचंड वाढ लक्षात घेता वर्तमान स्थितीत शेती करणेही शेतक-यांच्या आवाक्याबाहेरचे होऊ लागले आहे.अशातच राज्य शासनाने बोनस मधुन आपले हात झटकल्यास शेतकरी अधिकच होरपळून निघण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शेतक-यांचे संपुर्ण जीवनमान शेतीवरच अवलंबून असल्याने व वार्षिक नियोजन धान पिकावरच अवलंबून असल्याने उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळणे अपेक्षित असताना तुटपुंजी भाववाढ करून शेतक-याला आशेवरच जगवण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. हे थांबवुन शेतक-यांना यथायोग्य न्याय मिळण्यासाठी राज्य शासनावर अवलंबून राहावे लागु नये,यास्तव धानाला प्रति क्विंटल 3 हजार रुपये भाव देण्याची मागणी देसाईगंजचेएक तहसीलदार यांच्या मार्फतीने केन्द्रीय कृषी मंत्री ना. नरेंद्रसिंह तोमर यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
यावेळी तालुका काॅग्रेसचेया अध्यक्ष परसराम टिकले, शहर अध्यक्ष पिंकु बावणे, नगरसेवक आरीफ खानानी, नरेंद्र गजपुरे,राजु बुल्ले, विनायक वाघाडे,दत्तु शंभरकर,राजेश्वर पिलारे, सुरेश खरकाटे,विजय मेश्राम आदी काॅग्रेस कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
मंगला गिरीश चुंगडे
महिला न्युज रिपोर्टर
वडसा