दोन लाखाचा सुगंधीत तंबाकू जप्त दोघे ताब्यात
वणी
महाराष्ट्र राज्यात बंदी असतांनाही सुगंधीत तंबाकूची तस्करी करणाऱ्या शहरातील एका व्यापाऱ्या सह एकाला पोलिसांनी अटक केली असून 2लाख 41 हजाराचा मजा कँपणीचा सुगंधीत तंबाकू जप्त केला आहे
महाराष्ट्र शासनाने सुगंधीत तंबाकू विकण्यावर बंदी घातली आहे तरी मात्र शहरात मोठ्या प्रमाणात सुगंधीत तंबाकू चढ्या दराने विकल्या जात आहे लगतच असल्यास तेलगणा राज्यातून या सुगंधीत तंबाकू ची आयात केल्या जात आहे शहरातील मुख्य बाजार पेठेत असलेल्या व्यापाऱ्या कडून शहरात मजा तंबाकू चिल्लर विक्रेत्यांना पुरविल्या जात आहे आटो मधून सुगंधीत तंबाकू नेत असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार वैभव जाधव यांना मिळाली शहरातील गुरूनगर परिसरात डी बी पथकाने सापळा रचून या वाहनांची तपासणी केली असता वाहनात मजा कँपणीचा सुगंधीत तंबाकूचे 320 डबे आढळून आल्याने सनी पटेल व चालक राजू यमूलवार यांना ताब्यात घेऊन 2 लाख 42 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे
आतिष सातोकर
वणी