BREAKING NEWS:
महाराष्ट्र

दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत कृषी विभागातील योजना व दिव्यांग व्यक्ती या विषयावर उद्या मोफत वेबिनार

Summary

मुंबई, दि.  25 : दिव्यांग व्यक्तींमध्ये  कृषी विभागातील  योजनांची  माहिती व जनजागृती करण्याच्या हेतूने दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे, यांच्यामार्फत उद्या मोफत वेबिनार आयोजित करण्यात येत आहे. दि. 26 ऑक्टोबर 2020 रोजी  सकाळी 11.30 वाजता प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना व […]

मुंबई, दि.  25 : दिव्यांग व्यक्तींमध्ये  कृषी विभागातील  योजनांची  माहिती व जनजागृती करण्याच्या हेतूने दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे, यांच्यामार्फत उद्या मोफत वेबिनार आयोजित करण्यात येत आहे.

दि. 26 ऑक्टोबर 2020 रोजी  सकाळी 11.30 वाजता प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना व दिव्यांग व्यक्ती याबाबत अधिक माहिती देण्याकरिता डी एम दिवेकर –  यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या मोफत वेबिनारचा लाभ घेण्याकरिता https://youtu.be/dcz4FiEF59g या लिंकचा वापर करावा.

दुपारी 12.15 वाजता फळबाग लागवड व दिव्यांग व्यक्ती याबाबत अधिक माहिती देण्याकरिता धनश्री जाधव यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या मोफत वेबिनारचा लाभ घेण्याकरिता या https://youtu.be/VujVS89SeLY लिंकचा वापर करावा.

दुपारी 3 वाजता राष्ट्रीय कृषी विकास योजना व दिव्यांग व्यक्ती याबाबत अधिक माहिती देण्याकरिता यशवंत केजळे यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या मोफत वेबिनारचा लाभ घेण्याकरिता https://youtu.be/Me5eWq1ygho या लिंकचा वापर करावा.

दुपारी 3.45  वाजता कृषी प्रक्रिया किसान संपदा योजनेंतर्गत कृषी प्रक्रिया क्लस्टरसाठी पायाभूत सुविधा निर्मिती व दिव्यांग व्यक्ती याबाबत अधिक माहिती देण्याकरिता सत्यवान वराळे –  यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या मोफत वेबिनारचा लाभ घेण्याकरिता https://youtu.be/4wW1RGGr8KQ या लिंकचा वापर करावा.

तसेच यापूर्वी दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे, यांच्यामार्फत आतापर्यंत घेण्यात आलेल्या वेबिनारचा लाभ घेण्याकरिता दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे, यांच्या यूट्यूब चॅनलला भेट द्यावी.

अमर वासनिक
न्यूज एडिटर
7774980491

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *