तीन मोटारसायल व हाॅयड्रॉलिक पंप चोरी करणारा आरोपी गिरफ्तार कन्हान पोलीसांनी आरोपी पकडुन एकुण १,२०,००० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
नागपूर कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत आंबेडकर चौक येथे असलेल्या पंजाब नेशनल बैंक च्या समोरून आरोपी गोलु बिहारी उंदेरीया याने तीन मोटारसायकल व हाॅयडाॅलिक पंप चोरून नेल्याची फिर्यादी पुरुषोत्तम कुंभलकर यांनी कन्हान पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध तक्रार दिली असता कन्हान पोलीसांनी गोलु बिहारी उंदेरीया याला अटक करुन त्यांचा जवळुन एकुण एक लाख वीस हजार (१,२०,०००) रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस अटक केली.
प्राप्त माहिती नुसार बुधवार (दि.३) फेब्रुवारी ला दुपारी ०१ ते ०१.५० च्या सुमारास कन्हान पोलीस पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त माहीती द्वारे सुचना मिळताच मौजा टेकाडी येथील आरोपी गोलु बिहारी उंदेरीया वय २५ वर्ष राहणार टेकाडी साई मंदिर जवळ हा काल चोरी गेलेली होंडा शाईन गाडी चोरली अस ल्याच्या माहितीची शहानिशा करित स्थानिक परिसरा तील दोन वरिष्ठ प्रतिष्ठित नागरिकांना लेखी सुचना पत्र देऊन पंच बोलवुन त्यांच्या सह टेकाडी साई मंदिर येथे गेले असता एक इसम पोलीसांना पाहुन पडु लागला असता त्यास सहकार्याच्या मदतीने पकडले व त्यास विचारफुस केली असता त्यांनी पंचासमक्ष झडती मध्ये कन्हान पोलीस स्टेशन येथील अप क्र ३७/२० कलम ३७९ भादंवि मधिल हाॅंडा शाईन दुचाकी क्र एमएच – ४० – ए एन – ७९८० किंमत पंन्नास हजार रुपये व अप क्र ०९/२१ कलम ३७९ भादंवि मधिल पॅशन प्रो दुचा की क्र एमएच – ४० – एएफ – ८८८७ किंमत तीस हजा र रुपये आणि पोलीस स्टेशन राणाप्रताप नगर नागपुर शहर येथील अप क्र २५६/२० कलम ३७९ भादंवि मधिल स्लेंडर दुचाकी क्र एमएच – ३१ – ईजी – ८६९६ किंमत चाळीस हजार रुपये असा एकुण एक लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल मिळुन आल्याने कन्हान पोलीसांनी आरोपी गोलु बिहारी उंदेरीया वय २५ वर्ष रा. टेकाडी यास अटक करून त्यांच्या जवळील एकुण १,२०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन त्यांचे विरुद्ध अप क्र ३१/२१ भादंवि ३७९ नुसार गुन्हा दाखल करू न पुढील तपास सुरू केला आहे . सदर कारवाई पोली स उपविभागीय अधिकारी मुक्तार बागवान साहेब यां च्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस निरीक्षक अरूण त्रिपाठी, सपोनि सतिश मेश्राम, पोहवा येशु जोसेफ, नापोशि राहुल रंगारी, पोशि मुकेश वाघाडे, सुधिर चव्हाण, मंगेश सोनटक्के, शरद गिते, विरेंन्द्रसिंह चौध री, विशाल शंभरकर, चालक जितेंन्द्र गावंडे सह आदी कन्हान पोलीस कर्मचा-यांनी यशस्वितेरित्या पार पाडली.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535