तासगाव मोबाईल फोन मतदान केंद्रात अथवा 200 मिटर आत नेणाऱ्याच्यांवर कारवाही करणार;निवडणूक नियंत्रण अधिकारी तथा तहसिलदार कल्पना ढवळे
राजू थोरात तासगाव प्रतिनिधी
तासगाव तालुक्यातील 39 ग्रामपंचायत निवडणूका लागल्या आहेत.3 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत.
काही गावात दुरंगी तर काही गावात तिरंगी लढत होत आहे.
तर काही गावात काट्याची लढत होणार आहे.पोलीस प्रशासनही बंदोबस्त लावून सज्ज झाले आहेत.
निवडणूक नियंत्रण अधिकारी तथा तहसिलदार कल्पना ढवळे यांनी पत्रकार यांना सांगितले की
तासगाव तालुक्यातील 39 गावातील ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात सर्व मतदार, यांना सुचित करण्यात येते की निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रावर किंवा मतदान केंद्राच्या परिसरात कोणत्याही परिस्थितीत मोबाईल फोन वापरता येणार नाही. या परिसरात व्हिडिओ शूटिंग करण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे मतदानासाठी येताना मोबाईल घरीच अथवा दोनशे मीटरच्या बाहेर ठेवावा. कोणीही या परिसरात मोबाईलचा वापर अथवा छायाचित्रण करताना आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
पुढे ढवळे म्हणाल्या
त्याचबरोबर कोंविडच्या अनुषंगाने आपल्याबरोबर सार्वजनिक सुरक्षिततेचा विचार करून प्रत्येक मतदाराने मास्क लावल्याशिवाय मतदान केंद्रात प्रवेश करू नये.
🔴Imp🔴
चौकट
निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे.36 गावात पोलिस कुमक थांबुन आहे.
काही गावात काठाच्या लढती होणार आहेत.