BREAKING NEWS:
महाराष्ट्र

तांडव विरोधात ठिय्या आंदोलन करणारे राम कदम पोलिसांच्या ताब्यात!

Summary

🎬 भारतामध्ये क्रिकेट आणि चित्रपट सामाजिक जीवनाशी जोडले गेले आहेत. चित्रपटात किंवा मनोरंजनाच्या क्षेत्रात आणि क्रिकेटमध्ये होणारी प्रत्येक गोष्ट जनमानसाच्या मानसिकतेवर थेट परिणाम करणारी ठरते. मनोरंजनाच्या माध्यमातून एखादी गोष्ट दाखवत असताना धार्मिकतेवर हल्ला झाला तर, भारतामध्ये ती गोष्ट विकोपाला जाऊ […]

🎬 भारतामध्ये क्रिकेट आणि चित्रपट सामाजिक जीवनाशी जोडले गेले आहेत. चित्रपटात किंवा मनोरंजनाच्या क्षेत्रात आणि क्रिकेटमध्ये होणारी प्रत्येक गोष्ट जनमानसाच्या मानसिकतेवर थेट परिणाम करणारी ठरते. मनोरंजनाच्या माध्यमातून एखादी गोष्ट दाखवत असताना धार्मिकतेवर हल्ला झाला तर, भारतामध्ये ती गोष्ट विकोपाला जाऊ शकते.

📽️ तांडव या वेब सिरीज मध्ये सुद्धा भगवान राम आणि भगवान शंकरावर एका सीनमध्ये भाष्य करण्यात आले आहे. याविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेत ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात राम कदम हे सर्वेसर्वा होते. या प्रकरणी घाटकोपर येथील चिराग नगर पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

🎥 या वेब सिरीज चे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले आहे. या वेब सिरीज मुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा भाजपचा आरोप आहे आणि पोलिसही कारवाई करायला तयार आहेत. मात्र सरकार त्यांना रोखत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

🙏 दरम्यान, अली अब्बास जफर यांनी धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नव्हता आणि तसे झाले असेल तर मी कोणत्याही अटी विना माफी मागतो असे जाहीर केले आहे. राम कदम मात्र भारतामध्ये धार्मिकतेवर असा हल्ला आणि देवी-देवतांचा होणारा अपमान सहन करणे चूक असल्याचे बोलत आहेत. पोलिसांची प्रतिमा देखील यात मलिन करण्यात आल्याचे राम कदम यांनी बोलले आहे.

📍 दिग्दर्शक आणि निर्माता मात्र या घटनेचा कोणताही संबंध वास्तवाशी नसल्याचे सांगत ही केवळ काल्पनिक कथा असल्याचे बोलत आहेत.

विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *