… तर मीच मागे हटते, आपल्यावरील आरोपांनंतर रेणू शर्मांचे ट्विट मृत्यूपर्यंत लढा देणार, ढोंगीला शिक्षा मिळणारच; मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेचे ट्विट
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या गायिका रेणू शर्मा यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. भाजप, मनसेच्या नेत्यांनी रेणू शर्मा यांच्या फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगचे आरोप केल्याने आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
आपल्यावर झालेल्या या आरोपानंतर रेणू शर्मा यांनी एकामागोमाग अनेक ट्विट करत आपली बाजू मांडली आहे. एक काम करा तुम्हीच सर्व निर्णय घेऊन टाका. कोणतीही माहिती न घेता तुम्ही सर्व आणि जे मला ओळखत आहेत तेही आरोप करत आहात तर मग तुम्ही सर्व मिळून निर्णय घ्या. आता मीच माघार घेते तुमचीही तिच इच्छा आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे. सोबतच कृष्णा हेगडे यांनी केलेले आरोप फेटाळले आहे.
रेणू शर्मा यांनी आणखी एक ट्विट केले की, जर मी चुकीची होते तर आत्तापर्यंत का नाही हे लोक बोलले. जरी मी माघार घेतली तरी मला गर्व असेल, कारण संपुर्ण महाराष्ट्रात मी एकटी मुलगी लढत आहे. मी कोणत्याही पक्षाच्या नेत्याचं नाव घेतलं नाही आणि तरी ते माझ्यावरच आरोप करत आहेत. मला हटविण्यासाठी कितीतरी लोकांना पुढे यावे लागत आहे.
दरम्यान, रेणू शर्मा यांच्याविरोधात कृष्णा हेगडे, मनिष धुरी यांच्यानंतर जेट एअरवेजचे अधिकारी रिझवान कुरेशी यांनीही तक्रार केली आहे. तर दुसरीकडे, त्यांचे वकील रमेश त्रिपाठी यांच्यावर देखील विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
सचिन सावंत शेलेवाडी
(मंगळवेढा) सोलापूर
9370342750
पोलिस योद्धा न्युज नेटवर्क