BREAKING NEWS:
महाराष्ट्र

डोळयाचा दवाखाना व चष्म्याचा दुकानास आग लागुन राखरागोंळी.

Summary

नागपूर(कन्हान) : – नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महा मार्ग कन्हान शहरातील डोळ्याचा दवाखाना व चष्मा दुकानास रात्री अचानक आग लागुन अग्निशमन बंब गाडी येई पर्यंत डोळे तपासणी यंत्रे, चश्मे व फर्निचर आगीने जळुन राखरांगोळी झाल्याने अंदाजे आठ ते नऊ लाखाचे […]

नागपूर(कन्हान) : – नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महा मार्ग कन्हान शहरातील डोळ्याचा दवाखाना व चष्मा दुकानास रात्री अचानक आग लागुन अग्निशमन बंब गाडी येई पर्यंत डोळे तपासणी यंत्रे, चश्मे व फर्निचर आगीने जळुन राखरांगोळी झाल्याने अंदाजे आठ ते नऊ लाखाचे नुकसान झाल्याचे बोलल्या जात आहे.
सोमवार (दि.१६) नोव्हेंबर ला ११.३० वाजता मध्यरात्रीच्या सुमारास नागपुर जबलपुर राष्ट्रीय चार पदरी महामार्गावरीव कन्हान शहरातील विजय मॉर्केट येथील डॉ नागपाल याच्या डोळ्याचा दवाखाना व चष्माच्या दुकान ते नेहमी प्रमाणे बंद करून कामठी ला घरी गेल्यावर रात्री अचानक दुकानास आत मध्ये आग लागुन छतातुन धुवा व आग बाहेर निघत असल्याचे लोकांना दिसल्याने दुकानदारास व प्रशासनास माहीती देत आग विझविण्या करिता अग्निशमन बंब गाडी बोलावली परंतु वेकोलि कामठी कोळसा खदान आणि नगरपरिषद कामठी येथील अग्निशमन बंब गाडी येई पर्यंत डोळे तपासणी यंत्रे, चश्मे व फर्निचर आगीने जळुन राखरांगोळी झाली होती. दोन्ही अग्निशमन बंबच्या मदतीने उशिरा रात्री आगीवर नियत्रंण मिळविल्याने आजु बाजुच्या दुकानास आगी पासुन वाचविण्यात आले. ही आग शॉटसक्रिट ने लागली असल्याचे बोलल्या जात असुन या आगीत डोळे तपासणी एक यंत्र किंमत पाच लाख, दुसरे यंत्र दिड लाख व चश्मे, फर्निचर असा अंदाजे आठ ते नऊ लाखाचे नुकसान झाल्याचे वर्तविण्यात येत आहे.
✍🏼संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
९५७९९९८५३५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *