डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदतर्फे छोटेखानी नियुक्ती कार्यक्रमाचे आयोजन
Summary
नागपूर:- डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेतर्फे नुकतेच एका छोटेखानी नियुक्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विभागीय प्रवक्ता म्हणून कीर्ती काळमेघ वनकर यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली. तसेच नागपूर माध्यमिक जिल्हाध्यक्ष म्हणून नंदलाल यादव तसेंच उपाध्यक्ष म्हणून विनेश फुलेकर यांची नियुक्ती करण्यात […]
नागपूर:- डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेतर्फे नुकतेच एका छोटेखानी नियुक्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विभागीय प्रवक्ता म्हणून कीर्ती काळमेघ वनकर यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली. तसेच नागपूर माध्यमिक जिल्हाध्यक्ष म्हणून नंदलाल यादव तसेंच उपाध्यक्ष म्हणून विनेश फुलेकर यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हापरिषद कार्याध्यक्ष म्हणून पक्षभान ढोक यांची नियुक्ती करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांताराम जळते. प्रमुख अतिथी म्हणून विभागीय अध्यक्ष संजय निंबाळकर तसेच विभागीय महिला संघटक हर्षा वाघमारे उपस्थित होत्या.
डॉ पंजाबराव देशमुख ही शिक्षक आणि विदयार्थ्यांसाठी सातत्याने कार्यरत असते. शिक्षकांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी देखील पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद नेहमीच सज्ज असते.नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांमुळे संघटना अधिक बळकट होईल असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष शांताराम जळते यांनी व्यक्त केले.कार्यकमाचे संचालन माध्यमिक सचिव संजीव शिंदे यांनी केले.
दिलीप भुयार
पश्चिम नागपूर प्रतिनिधी