BREAKING NEWS:
महाराष्ट्र

जि,प.सदस्य वैशालीच्या गाडीने केला अपघात?? प्रकरण दडपण्यासाठी केला कुंभारे हाॅस्पीटल मध्ये भरती??

Summary

गडचिरोली / प्रतिनिधी.. २७ जानेवारी २०२१. येथुन जवळच असलेल्या शिवनी येथील स्थित असलेल्या ,दारू बंद असलेल्या जिल्ह्यात पोलीसांच्या आशिर्वादाने खुलेआम दारू विक्री करणाऱ्या एका जिल्हा परिषद च्या सदस्य असलेल्या वैशाली किरण ताटपल्लीवार यांच्या गाडीने दिनांक २४ जानेवारी रविवार दुपारच्या सुमारास […]

गडचिरोली / प्रतिनिधी.. २७ जानेवारी २०२१.
येथुन जवळच असलेल्या शिवनी येथील स्थित असलेल्या ,दारू बंद असलेल्या जिल्ह्यात पोलीसांच्या आशिर्वादाने खुलेआम दारू विक्री करणाऱ्या एका जिल्हा परिषद च्या सदस्य असलेल्या वैशाली किरण ताटपल्लीवार यांच्या गाडीने दिनांक २४ जानेवारी रविवार दुपारच्या सुमारास भयानक अवस्थेत झाला होता. सेमाना जवळ झालेल्या या
दुचाकीच्या अपघातात कृपाळा येथील दोन तरुण झाले गंभीर जखमी झाले. त्यांना गडचिरोली येथील डॉ. कुंभांरे यांच्या
खासगी दवाखान्यात उपचारांसाठी भरती करण्यात आले. खाजगी दवाखान्यात भरती करतो पण पोलिसांत तक्रार करु नका म्हणून 15 हजार रुपये नाममात्र रक्कम देऊन त्या गरीब तरुणांच्या कुटूंबावर काही दलालांच्या मध्यस्थीने फार मोठा दबाव आणल्या गेला होता .डॉ.
कुंभारे यांच्या दवाखान्यातून सुट्टी करून झाडपाला / गावठी उपाय करण्याचाही सल्ला ताटपल्लीवार यांनी दिला . मात्र गडचिरोली जिल्ह्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करताच हा गंभीर आणि जि. प. सदस्य यांच्या गाडीने झालेल्या बेसुमार धावणाऱ्या गाडीचा अपघात उघडकीस आला. या प्रकारणात त्या गरीब तरुणांच्या कुटूंबावर दबाव आणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या जि.प.सदस्य वैशाली किरण ताटपल्लीवार यांनी आपल्या सहकारी असलेल्या बऱ्याच लोकांच्या माध्यमातून केला असल्याची परिसरात खूप चर्चा होत आहे.त्यांचेवर कडक कारवाई करण्याची मागणीही जनमानसात होत असलेल्या चर्चा वरुन होत आहे. तुम्ही माझ्या नावाने पोलीस ठाण्यात तक्रार केली तरी माझ्यावर काहीच कारवाई होणार नाही,उलट तुमच्या वरच गुन्हा करून दाखवतो. दाखल होणार नाही तर मी तुमच्यावर कसा गुन्हा दाखल करून दाखवतो. ते पहात रहा..अशी तंबीही या तरुणांच्या नातेवाईक आणि अपघात ग्रस्त तरुणांना दिली..त्यापेक्षा 15 हजार रुपये घेऊन डॉ.कुंभारे यांच्या खाजगी दवाखान्यातून सुट्टी करून घ्या आणि झाडपाला / गावठी उपाय करा असा सल्ला वैशाली ताटपल्लीवार यांचे पती किरण ताटपल्लीवार यांनी अपघात ग्रस्त तरुणांच्या कुटुंबातील सदस्यांना दिला होता. मात्र दोन्ही पाय निकामी होवून प्रचंड वेदना होत असल्याने अपघात ग्रस्त तरुणांना गडचिरोली शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे: सदर अपघातग्रस्त तरुणांवर शासकीय रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली निःशुल्क उपचार सुरू आहेत.तसेच हलाखीच्या गरीब परिस्थितीत खासगी रुग्णालयात लाखो रुपये खर्च करून उपचार कसा करायचा या चिंतेने अपघातग्रस्त तरुणांचे कुटुंब बचैन झाले आहे.तर दुसरीकडे आपल्या राजकीय जोरावर बेधडकपणे अपघात करुनही जि.प‌.सदस्य वैशाली ताटपल्लीवार आणि त्यांचे पती किरण ताटपल्लीवार मोकाट आहेत. या गंभीर प्रकरणाचा तपास पोलीस विभागाचे तपास अधिकारी योग्य पद्धतीने करणार?? अशा अनेक ठिकाणी चर्चा ऐकावयास मिळत आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *