चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत करोडोचा घोटाळा रोखपालावर कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप…
चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चंद्रपूर येथील शाखेत मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचं वृत्त आहे. हा आर्थिक घोटाळा तब्बल दीड कोटींचा असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या प्रकरणी रोखपाल पदावर असलेल्या व्यक्तिवर फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे.
या व्यक्तिने ग्राहकांची फसवणूक करून त्यांनी दिलेले पैसे अकाउंटला न टाकता स्वतःच्या खिशात टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. एका सहकारी सोसायटीने भरायला दिलेली मोठी रक्कम खात्यात जमा न झाल्याने या घोटाळ्याचं बिंग फुटलं आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्याची तयारी सुरू झाली आहे.तसंच या प्रकरणात किती ग्राहकांना फसवण्यात आलं आहे, याच्या तपशीलाची चौकशी करण्यात येत आहे.
विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर