BREAKING NEWS:
महाराष्ट्र

घरबसल्या रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर आणि पत्ता अशाप्रकारे करा अपडेट

Summary

रेशन कार्डमध्ये काही बदल करायचे असल्यास, रेशन कार्डावरील पत्ता, नावात बदल किंवा आणखी काही बदल करायचा असेल तर फार कष्ट घेण्याची गरज लागणार नाही. हे सर्व बदल घरबसल्या ऑनलाईन पद्धतीनंही करता येणार आहेत. यासाठी कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. […]

रेशन कार्डमध्ये काही बदल करायचे असल्यास, रेशन कार्डावरील पत्ता, नावात बदल किंवा आणखी काही बदल करायचा असेल तर फार कष्ट घेण्याची गरज लागणार नाही. हे सर्व बदल घरबसल्या ऑनलाईन पद्धतीनंही करता येणार आहेत.

यासाठी कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. रेशन कार्ड खूप महत्त्वाचं आहे. सरकार राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत दर महिन्याला नागरिकांना स्वस्तात धान्य पुरवठा करते.

केंद्र सरकारने नुकतीच वन नेशन,वन रेशन कार्ड योजना लागू करण्याची घोषणा केली आहे. रेशन कार्डमध्ये कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावाची नोंदणी करायची राहिली असल्यास ती कशी करायची, घरबसल्या रेशन कार्ड कसं अपडेट करायचं हे जाणून घेऊया.

सर्वात आधी भारत सरकारच्या Www.pdsportal.nic.in या लिंकवर जा.

यानंतर राज्यांची नावे असलेल्या टॅबवर क्लिक करा.

यानंतर नवीन टॅबवर राज्यांची यादी येईल.

तुम्ही ज्या राज्यात राहत आहात त्याची निवड करा.

यानंतर नवीन पेज ओपन होईल.

त्यानंतर घरबसल्या रेशन कार्डमध्ये (Ration card) माहिती अपडेट करण्यासाठी संबंधित राज्याच्या अन्न पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जा.

पहिल्या वेळेस वेबसाईटवर लॉगिन आयडी तयार करावा लागेल. यामध्ये जी माहिती भरायची आहे ती भरून सबमिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर याची एक प्रिंट तुमच्याकडे बाळगा.

याच पद्धतीने तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक देखील अपडेट करू शकता. यासाठी तुम्हाला सर्वात आधी nfs.delhi.gov.in/Citizen/UpdateMobileNumber.aspx या लिंकवर जावे लागेल. त्यानंतर Update Your Registered Mobile Number हा पर्याय दिसेल.

यात तुम्हाला कुटुंब प्रमुखाचा आधार क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर कुटुंब प्रमुखाचे नाव टाकून सर्वात शेवटी जो मोबाईल क्रमांक अपडेट करायचा आहे तो टाकायचा आहे. हा क्रमांक टाकून सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक अपडेट होईल
सचिन सावंत मंगळवेढा
9370342750

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *