गोंडवाना विद्यापीठाचा पदवीदान समारंभ गडचिरोली येथेच घेण्यात यावा. सिनेट सदस्य प्रा. संध्या येलेकर यांची मागणी
Summary
गोंडवाना विद्यापीठाचा चंद्रपूर येथे होऊ घातलेला पदवीदान समारंभ गडचिरोली येथेच घेण्यात यावा अशी मागणी गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य प्रा. संध्या येलेकर यांनी केली आहे. गोंडवाना विद्यापीठाचे मुख्यालय गडचिरोली येथे असून संपूर्ण प्रशासकीय कामकाज गडचिरोली येथूनच चालविल्या जाते. विद्यापीठ परिसरात पदवीदान […]
गोंडवाना विद्यापीठाचा चंद्रपूर येथे होऊ घातलेला पदवीदान समारंभ गडचिरोली येथेच घेण्यात यावा अशी मागणी गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य प्रा. संध्या येलेकर यांनी केली आहे.
गोंडवाना विद्यापीठाचे मुख्यालय गडचिरोली येथे असून संपूर्ण प्रशासकीय कामकाज गडचिरोली येथूनच चालविल्या जाते. विद्यापीठ परिसरात पदवीदान समारंभासाठी पुरेशी जागा व पर्याप्त यंत्रणा गडचिरोली येथे उपलब्ध आहे. या आधीचे सर्व पदवीदान समारंभ गडचिरोली येथे यशस्वीपणे संपन्न झाले आहेत. एवढेच नव्हे तर विद्यापीठाचे राष्ट्रीय स्तरावरील अनेक समारंभ, परिषदा सुद्धा येथेच यशस्वीपणे संपन्न झाल्या आहेत. एवढे सर्व असताना यावर्षीचा पदवीदान समारंभ चंद्रपूर येथे हलविण्याचे काहीही कारण नाही. गडचिरोली जिल्ह्यातील विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी सुद्धा पदवीदान समारंभ गडचिरोली येथेच व्हावा अशी मागणी केलेली आहे. जिल्ह्यातील सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक वातावरण अधिक बिघडू नये यासाठी गोंडवाना विद्यापीठाचा पदवीदान समारंभ गडचिरोली येथेच घेण्यात यावा अशी मागणी प्रा. संध्या येलेकर यांनी केली आहे.
प्रा शेषराव येलेकर
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी