गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ आता गडचिरोली येथेच ऑनलाइन पद्धतीने होणार. गोंडवाना विद्यापीठाची अधिसूचना जारी
Summary
गोंडवाना विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्र 2019- 20 च्या विविध पदवी, पदव्युत्तर व पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदके तसेच पदवी बहाल करण्याच्या अनुषंगाने विद्यापीठाचा आठवा दीक्षांत समारंभ 28 जानेवारी 2021 रोजी चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला होता. परंतु गडचिरोली जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना, […]
गोंडवाना विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्र 2019- 20 च्या विविध पदवी, पदव्युत्तर व पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदके तसेच पदवी बहाल करण्याच्या अनुषंगाने विद्यापीठाचा आठवा दीक्षांत समारंभ 28 जानेवारी 2021 रोजी चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला होता. परंतु गडचिरोली जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व विद्यापीठाचे काही सिनेट सदस्यांनी याला प्रचंड विरोध केल्यामुळे आता हा दीक्षांत समारंभ गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे 28 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता आभासी(ऑनलाईन) पद्धतीने घेण्यात येणार आहे. अशा प्रकारची अधिसूचना गोंडवाना विद्यापीठाने आज दिनांक 19 जानेवारी 2021 रोजी जारी केली आहे.
सदर दीक्षांत समारंभाचे अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे कुलपती माननीय श्री भगतसिंह कोश्यारी, महामहिम राज्यपाल महाराष्ट्र राज्य, प्रमुख अतिथी म्हणून मा. डॉ. एस. सी. शर्मा संचालक नॅक बँगलोर, तसेच गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. श्रीनिवास वरखेडी व प्र-कुलगुरू मा. डॉ. श्रीराम कावळे यांच्या आभासी(ऑनलाईन) उपस्थितीत संपन्न होणार आहे.
गडचिरोली जिल्हा
प्रतिनिधी
प्रा. शेषराव येलेकर