*गॅस सिलेंडर अवैधरीत्या तिन चाकी व चार चाकी वाहनांत पलटवण्यात असामाजिक तत्व सक्रिय* पेट्रोल,डीझेलचे दर वाढल्याने गँस सिलेंडर तीन चाकी वाहनात वापर जोमात.
नागपूर कन्हान : – देशात, राज्यात तसेच शहरात देखील पेट्रोल व डीझेलचे भाव दिवसे दिवस वाढत चाललेले आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांच जगन भयंकर त्रास दायक झाले आहे. तरी देखील पेट्रोल व डिझेल वाहन धारक नाहीलाजाने वाढीव दराला समाधान मानावे ला गते. या उलट शहरात दिवसेंदिवस ऑटोरिक्षा एल.पी. जी. वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असुन त्या अनु षंगाने शहरात ऑटो एल.पी.जी. गॅस पंपाची संख्या सुध्दा वाढलेली आहे. काही ठिकाणी मुबलक प्रमाणा त ऑटो एल.पी.जी.चे वितरण पंप स्टेशन्स वरून एल .पी.जी. वाहनधारकांना पुरवण्यात येते. पंरतु पेट्रोल व डीझेल सोबत एल.पी.जी. गॅस पंपाचा दरात वाढ होत असल्याने घरगुती सिलेंडरचे दर जास्त प्रमाणात न वा ढल्याने काही टोळ्या तसेच असामाजिक तत्व, व्यक्ती घरगुती वापरातील सबसिडी धारकांचे एल.पी.जी. गॅ स सिलेंडर अवैधरीत्या तिन चाकी व चार चाकी वाह नांमध्ये पलटी करून वापरात आणतात. या टोळ्या तसेच व्यक्ती थोड्याफार पैशासाठी स्वतः सोबत परिस रातील नागरिकांचा जिव धोक्यात घालुन अवैधरित्या दोन ते तीन हजाराचा किंमतीच्या मशीन बाजारात सह ज उपलब्ध होत असुन किंवा कुणा कडून बनवुन घेऊ न एल.पी.जी. वाहनात उपयोग करीत आहे. घरगुती एल.पी.जी. गॅस सिलेंडर धारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. त्याना वेळेवर सिलेंडर उपलब्ध होत नसुन घरगुती सिलेंडरचा काळाबाजार करून वा हन धारकांना पुरविले जातात, त्यामुळे सबसिडी धार कांना नेहमीच एल.पी.जी. गॅस सिलेंडर चा तुटवड्या चा सामना करावा लागतो. सणांचा महिन्यात सामान्य नागरिकांना गॅस सिलेंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्या ने तारेवरची कसरत महिलां व पुरूष मंडळीला करावी लागते. नाइलाजास्तव त्यांचा हक्काची सबसिडीचे हेच गॅस सिलेंडर अशा टोळ्याकंडुन अवैध (ब्लॅक) मध्ये घेण्याची नामुष्की सामान्य नागरिकांना येते. आता मा त्र नित्याचेच होत आहेत.
अवैध गॅस पुरवण्यासाठी कन्हान-पिपरी, कांद्री, कोळसा खदान परिसरात व कामठी ग्रामीण भागात अनेक कार्यरत आहेत. पोलीस प्रशासन, संबधित अन्न पुरवठा अधिका-यानी त्वरीत कार्यवाही करून परिसरा त सर्व अवैधरित्या एल.पी.जी. गॅस सिलेंडरचा काळा बाजार व घरगुती एल.पी.जी. वाहनात वापरण्या-यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी. अशी सुज्ञ नागरीकांत चर्चेला ऊत येत आहे.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535