खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने सांस्कृतिक नगरी डोंबिवलीत होणार वैद्यकीय क्रांती..!
Summary
जिल्हा ठाणे वार्ता:- हजारो गरीब रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे आणि संकल्पनेतून एमआरआय, पथोलॉजी, रेडिओलॉजी, सिटी स्कॅन आदी सारख्या अद्यावत सुविधा सुरू होणार आहेत. अत्यंत अद्ययावत अशा या वैद्यकीय उपकरणांमुळे रोगनिदानाची […]
जिल्हा ठाणे वार्ता:- हजारो गरीब रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे आणि संकल्पनेतून एमआरआय, पथोलॉजी, रेडिओलॉजी, सिटी स्कॅन आदी सारख्या अद्यावत सुविधा सुरू होणार आहेत. अत्यंत अद्ययावत अशा या वैद्यकीय उपकरणांमुळे रोगनिदानाची अचूकता वाढणार आहे. तसेच, या महागड्या वैद्यकीय सेवा गरीब रुग्णांना अत्यल्प दरात मिळणार आहे.
तसेच येत्या काळात कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण पूर्वेत देखील अश्या सुसज्ज सुविधा देण्यासाठी खासदारांनी पाठपुरावा सुरू केला असून लवकरच तोही संकल्प पूर्णत्वास जाईल. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील या अद्यावत सुविधांचा लोकार्पण सोहळा सोमवार २६ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित संपन्न होणार आहे.
एकंदरीत डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे हे आपल्या मतदारसंघात रस्ते, रेल्वे आदी पायाभूत सुविधांसोबतच मतदारसंघाचा आरोग्य स्तर उंचावण्यासाठी कमालीचे प्रयत्नशील असल्याचे दिसून आले
जगदीश जावळे
नुज रिपोर्टर
ठाणे जिल्हा
महाराष्ट्र राज्य