BREAKING NEWS:
महाराष्ट्र

खबरदार! विजयी मिरवणुका काढण्याचे धाडस कराल तर सावधान, काय म्हणतो आदेश; वाचा सविस्तर

Summary

ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयानंतर मिरवणुका काढून विजयोत्सव साजरा करण्याचे नियोजन करत असाल तर थांबा. कारण, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मिरवणुका काढण्यावर बंदी घातली असून या आदेशाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिला आहे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल आज सोमवारी […]

ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयानंतर मिरवणुका काढून विजयोत्सव साजरा करण्याचे नियोजन करत असाल तर थांबा. कारण, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मिरवणुका काढण्यावर बंदी घातली असून या आदेशाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिला आहे

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल आज सोमवारी जाहीर होणार आहे, त्या पार्श्‍वभूमीवर हा फतवा काढण्यात आला आहे. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, सोमवारी पहाटे बारापासून रात्रीचे बारापर्यंत म्हणजे सोमवारी (ता. 18 जानेवारी) संपूर्ण दिवस विजयी मिरवणूक काढणे, रॅली काढणे, फटाके फोडणे, गुलाल उधळणे, विना परवानगी फ्लेक्‍स अथवा बॅनर लावू लावण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.

तसेच आज सोमवारी (ता. 18 जानेवारी) रात्री दहा ते मंगळवारी (ता. 19 जानेवारी) सकाळी सहापर्यंत हॉटेल, ढाबे, खानावळी, चायनीज, पान टपरी या सेवा बंद राहतील. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांच्या विरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, राजकीय पटलावरील लोकशाहीच्या या ग्रामपातळीवरील उत्सवाची सांगता खरेतर विजयी मिरवणुकीने होत असते. त्यासाठी गुलालाची मुक्त उधळण, फटाक्‍यांची आतषबाजी आणि डीजेचा दणदणाट याची सर्वतोपरी तयारी करून ठेवली जाते.

यंदाही अनेक ठिकाणी त्याची तयारी करण्यात आली असतानाच जिल्हा प्रशासनाने विजयी मिरवणुकांवर व डीजेच्या दणदणाटावर बंदी घातल्याने गावोगावच्या ग्रामीण हौशी कलाकारांचा हिरमोड झाला आहे.

आपल्या उमेदवाराच्या विजयी मिरवणुकीत बेभान होऊन नाचायचे, डीजेवर अखंड थिरकायचे त्यासाठी “चार्जेबल’ द्रव्याचे मुक्त सेवन करायचे आणि पक्षीतीर्थाचा मनमुराद आस्वाद घ्यायचा, अशी स्वप्ने रंगविलेल्यांच्या स्वप्नांवर मिरवणूक बंदीने पाणी फेरले आहे. जल्लोषी मिरवणुकांवर बंदीचे साधक-बाधक पडसाद उमटत असताना हौशी कार्यकर्त्यांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली आहे

सचिन सावंत शेलेवाडी
(मंगळवेढा) सोलापूर
9370342750
पोलिस योद्धा न्युज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *