क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन सावित्रीबाई फुले शिक्षण दिनाच्याही दिल्या शुभेच्छा
Summary
मुंबई, दि. ३ :- स्त्री शिक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. सावित्रीबाई फुले यांची जयंती यापुढे ‘सावित्रीबाई फुले शिक्षण दिन’ म्हणून विविध उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. या […]
मुंबई, दि. ३ :- स्त्री शिक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. सावित्रीबाई फुले यांची जयंती यापुढे ‘सावित्रीबाई फुले शिक्षण दिन’ म्हणून विविध उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. या सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिनाच्याही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले.
अभिवादन संदेशात मुख्यमंत्री म्हणाले, स्त्रियांच्या जीवनात शिक्षणाची पहाट व्हावी यासाठी महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी आयुष्य वेचले. त्यासाठी प्रसंगी अनेक यातना, हेटाळणी, हल्ले सहन केले. स्त्री शिक्षणातूनच कुटूंब आणि पर्यायाने समाज पुरोगामी विचारांच्या वाटेवर चालू शकतो, यावर त्यांचा विश्वास होता. आज स्त्री शिक्षणात महाराष्ट्र आघाडीवर आहे. स्त्रियांनीही अनेक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. यासाठी आपल्याला क्रांतीज्योती थोर शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्यापुढे नतमस्तक व्हावे लागेल.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती यापुढे राज्यात सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सर्वांना शुभेच्छा देताना मनस्वी आनंद होत आहे. या दिनानिमित्त शालेय शिक्षण विभागाच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याला उजाळा देणारे विविध उपक्रम नव्या पिढीच्या सहभागाने आयोजित केले जाणार आहेत. नियोजित अशा या सर्व उपक्रमांनाही मनःपूर्वक शुभेच्छा.
संकलन
अमर वासनिक
7774980491