कोविड लस वितरणासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स; मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार टास्क फोर्सची स्थापना
मुंबई, दि. २४ : कोविड लस प्रभावीपणे निर्माण करून तिचे वितरण करणे, ती देण्याबाबतचा प्राधान्यक्रम निश्चित करणे आणि त्या लसीची किंमत व प्रमाण ठरविण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात दिलेल्या निर्देशानुसार या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.
या टास्क फोर्समध्ये वित्त, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव, आरोग्य सेवा आयुक्त, वैद्यकीय शिक्षण संचालक, डॉ. शशांक जोशी त्याचप्रमाणे जे.जे. आणि केईएम रुग्णालयाच्या प्रतिबंधात्मक आणि सामाजिक औषध विभागांचे प्रमुख सदस्य असतील.
या टास्क फोर्सने लस साठवण आणि वितरण व्यवस्थेसाठी शीत साखळी ठरविणे व लसीकरणाच्या शेवटच्या टप्प्यांपर्यंत आवश्यक बाबी तसेच किंमत ठरविणे अपेक्षित आहे.