महाराष्ट्र

कोरोना लस सोलापूरात दाखल, पहिल्या टप्प्यात या लोकांना मिळणार लस

Summary

अवघ्या देश वासियांनचे आणि सोलापूर करायचे ज्या कोरालसी कडे लक्ष लागले होते ती लस अखेर बुधवार 13 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात च्या सुमारास सोलापूरात दाखल झाली. सोलापूरात 16 जानेवारीपासून कोरोनाविरोधी लसीकरण मोहीम सुरू होणार आहे सोलापूरात ही सर्वात मोठी लसीकरण […]

अवघ्या देश वासियांनचे आणि सोलापूर करायचे ज्या कोरालसी कडे लक्ष लागले होते ती लस अखेर बुधवार 13 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात च्या सुमारास सोलापूरात दाखल झाली.

सोलापूरात 16 जानेवारीपासून कोरोनाविरोधी लसीकरण मोहीम सुरू होणार आहे सोलापूरात ही सर्वात मोठी लसीकरण मोहीम असणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहेत.

16 जानेवारी रोजी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात करण्याबाबत राज्य आयोग विभागाने निर्देश दिले आहेत त्याप्रमाणे जिल्हा आरोग्य विभाग लसीकरण करण्यासाठी सज्ज झाले आहे.

शहर आणि जिल्ह्यात अठरा बुथ निश्चित करण्यात आले आहेत.या बुथवर प्रत्यक्ष लसीकरण करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. लसीकरणासाठी पुण्यातुन बुधवारी लस घेऊन गाडी सोलापूरात दाखल झाली.

सिव्हिल हॉस्पिटलमधुन संबंधित बुथवर ही लस 16 जानेवारी रोजी निर्धारित केलेल्या वेळेत पोहचवली जाईल लसीकरणासाठी लागणारी सर्व साधनसामग्री लवकरच केंद्राकडे पोहच करण्यात येणार आहे..

सोलापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीचा गडबड सुरू असतानाच आता आरोग्य विभागात लसीकरणाची घाई सुरू झाली पोर्टलवर नोंद असलेल्या 38 हजार आरोग्य कर्मचारी डॉक्टरांना पहिल्या टप्प्यात च लस देण्यात येणार आहे लस दाखल झाल्यानंतर पुढील नियोजन वेगाने होणार आहे

कोरोना लस सर्वांना ऐच्छिक असणार आहे पहिल्या टप्प्यात डॉक्टर व आरोग्य कर्मचारी असल्यामुळे ही लस सर्वांनीच घ्यावी असा आग्रह धरला जाणार आहे लस सुरक्षित असलेल्या कोरोना प्रतिबंधासाठी यांचा मोठा उपयोग होणार नाही..

कोरोनाची लस सुरक्षित आहे याची खात्री सर्वांना पटावी यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा आरोग्य अधिकारी सिव्हिल सर्जन व प्रमुख अधिकार्याना पहिल्यांदा लस दिली जाणार आहे त्यानंतर लसीकरणास प्रारंभ केला जाणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ जाधव यांनी सांगितले ..

सचिन सावंत शेलेवाडी
(मंगळवेढा) सोलापूर
9370342750
पोलिस योद्धा न्युज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *