*कामठी तहसील कार्यालयात मतदान यंत्र सील ……*
नागपूर कामठी ……:-येत्या 15 जानेवारीला होऊ घातलेल्या कामठी तालुक्यातोल भामेवाडा, टेमसना, पावंनगाव, कोराडी, घोरपड, लोंणखैरी, केसोरी, खेडी , महालगाव या 9 ग्रा प ची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली असून या निवडणुकीत 87 जागेसाठी 237 उमेदवार निवडणूक रिंगणात असून एकूण 21 हजार 125 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत ज्यामध्ये 10 हजार 775 पुरुष मतदार व 10 हजार 350 स्त्री मतदारांचा समावेश आहे.या निवडणुकीसाठी 36 मतदान केंद्रावर 36 मतदान यंत्र राहणार असून कंट्रोल युनिट व बेलेट युनिट ची संख्या सुद्धा 36 राहणार आहे तर मतदान केंद्राध्यक्ष व मतदान केंद्र अधिकारी असे एकूण 204 कर्मचारो मतदान केंद्रावर राहणार असून 4 झोनल अधिकारी ची नेमणूक करण्यात आली आहे प्रत्येक मतदान केंद्रावर 14 जानेवारीला च मतदान यंत्र पाठवीन्यात येणार असून निवडणुकीच्या दिवशी मतदान यंत्रात कुठलीही किचकट प्रक्रिया न राहावे यासाठी आज कामठी तहसील कार्यालयात तहसोलदार अरविंद हिंगे यांच्या मुख्य उपस्थितीत ईव्हीएम मशीन ची तपासनी करून मतदान यंत्राच्या विविध प्रवर्गातील 87 उमेदवारांची नावे व त्यांची निवडणूक चिन्हे टाकण्यात आल्या.व मतदान यंत्र सोल करण्यात आल्या. याप्रसंगी परीक्षा विधीन तहसोलदार जीतेंद्र शिकतोडे, परीक्षविधीन नायब तहसोलदार माळी, नायब तहसीलदार उके, नायब तहसीलदार दुसावार, नायब तहसीलदार कावटी, चंद्रिकापुरे आदीं प्रामुख्याने उपस्थित होते
✍🏼संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
957998535