काटोल नरखेड तालुक्यातील आशा वर्कर यांची लता मंगेशकर हॉस्पिटल येथे बैठक संपन्न
काटोल-दुर्गाप्रसाद पांडे
लोकनेते मा. रणजीतबाबू देशमुख यांच्या अमृत महोत्सव निमित्त लता मंगेशकर हॉस्पिटल डिगडोह हिल्स, हिंगणा रोड, नागपूर येथे निशुल्क उपचार व ऑपरेशन शिबिर 25 डिसेंबर ते 26 जानेवारी आयोजित केले आहे त्यानिमित माजी आमदार डॉ. आशिषबाबू देशमुख यांनी काटोल नरखेड या दोन्ही तालुक्यात 11 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान काटोल तहसील मध्ये कोंढाली, रिधोरा, येनवा, मूर्ती, पारडसिंगा, बाजारगाव, काटोल येथे तर नरखेड तालुक्यात सावरगाव, बेलोना, पीपला केवलराम, लोहारी सावंगा, जलालखेडा, मोवाड, नरखेड येथे रोग निदान, रुग्ण भरती, व रक्त दान शिबीर आयोजित केले आहे त्या करिता आशा वर्कर यांची पुर्वनियोजित बैठक लता मंगेशकर हॉस्पिटल, काटोल येथे घेन्यात आली त्या कार्यक्रमाला एन के पी सिम्स, लता मंगेशकर हॉस्पिटल, नागपुर चे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. काजल मित्रा, पी एस एम विभागाचे, HOD डॉ. अजीत सावजी, प्रोफेसर डॉ. देवके, लता मंगेशकर हॉस्पिटल, काटोल वैद्यकीय अधीक्षक डॉ. लता तपनिकर, काटोल तालुका आरोग्य अधिकारी डॉ. व्यवहारे, काटोल ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिक्षक डॉ. डवरे, दिनकर राउत, दिलीप हिवरकर, जवाहर चरडे, विजय महाजन, रमेश फिस्के, नितिन धोटे, वैदयकीय अधिकारी डॉ. किशोर ढोबळे , डॉ भावना जेवडे, डॉ रूपल दरक, व असंख्य आशा वर्कर उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाला वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. काजल मित्रा, डॉ, अजीत सावजी, डॉ. देवके, डॉ. किशोर ढोबळे, दिनकर राऊत, जवाहर चरडे यांनी आशा वर्कर यांना मार्गदर्शन केले. व आशा वर्कर यांच्या सोबत संवाद साधला, तसेच आशा वर्कर नी सुद्धा आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे संचालन व आभार मीना पवार व प्रिती गुडधे यांनी केले व कार्यक्रमाला सर्व लता मंगेशकर हॉस्पिटल कर्मचारी उपस्थित होते.
दुर्गाप्रसाद पांडे काटोल (कोंढाळी)