BREAKING NEWS:
महाराष्ट्र

कल्याण मध्ये धक्कादायक प्रकार… प्रॉपर्टी स्वत:च्या नावावर करण्यासाठी वडिलांना दहा दिवस ठेवले डांबून… पत्नी, मुलगा, भाचा आणि पुतण्याला अटक…

Summary

कल्याण :  प्रॉपर्टी स्वत:च्या नावावर करण्यासाठी वडिलांना दहा दिवस घरात रस्सीने बांधून कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण पूर्वेतमध्ये घडला आहे.या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी पत्नी, मुलगा, पुतण्या आणि भाच्याला अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे. कल्याण पूर्वेत पावशेपाडा परिसरात राहणारे […]

कल्याण :  प्रॉपर्टी स्वत:च्या नावावर करण्यासाठी वडिलांना दहा दिवस घरात रस्सीने बांधून कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण पूर्वेतमध्ये घडला आहे.या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी पत्नी, मुलगा, पुतण्या आणि भाच्याला अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे.

कल्याण पूर्वेत पावशेपाडा परिसरात राहणारे सुरेश पावशे हे रिक्षा चालक आहेत. त्यांच्या नावावर काही लाखांची मालमत्ता आहे. ही मालमत्ता आमच्या नावावर करा अशी मागणी पत्नी आणि मुलगा अनेक दिवसापासून सुरेश यांच्या कडे करीत होते. सुरेश त्यांची वारंवार समजूत काढून त्यांची मागणी टाळत होते.अखेर प्रॉपर्टी नावावर करण्यासाठी पत्नी, मुलगा निखील, पुतण्या स्वप्नील आणि भाचा पुष्कर या चौघांनी मिळून सुरेशला रस्सीने बांधले.त्याला बांधून घराच्या एका रुममध्ये डांबून ठेवले. दहा दिवस सुरेश यांनी कशीबशी  सुटका करुन घेतली.त्यानंतर त्याने थेट कोळसेवाडी पोलिस ठाणे गाठले. कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी सुरेश पावशे यांच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करीत सुरेश यांची पत्नी, मुलगा निखील, पुतण्या स्वप्नील, भाचा पुष्कर या चौघांना अटक केली आहे. वरिष्ठ पोलिस निरिक्षक शाहूराज साळवे यांनी या प्रकरणाचा तपास पोलिस अधिकारी एस.एस.तडवी यांच्याकडे सोपविला आहे.पोलिसांनी या चौघांना अटक केली असून त्यांना दुसऱ्यांदा कोर्टात हजर केले जाणार आहे. 75 ते 80 लाखाच्या मालमत्तेसाठी आपल्या नावावर करण्यासाठीआरोपींनी हे कृत्य केले आहे असा पोलिसांनी सांगितले आहे. 
जगदीश जावळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *