BREAKING NEWS:
महाराष्ट्र

कन्हान ७४.३४ %, पारशिवनी ७९.६८% दोन्ही केन्द्रात पारशिवनी तालुका ७६.७६% मतदान.

Summary

नागपुर विभाग पदविधर मतदार संघाच्या निवडनूकीत मंगळवार दि.१ डिसेंबर २०२० रोजी कन्हान केंद्रात ४५६ पैकी ३३९ म्हणजे ७४.३४%, पारशिवनी केंद्रात ३७९ पैकी ३०२ म्ह़णजे ७९.६८% असे दोन्ही मिळुन पारशिवनी तालुक्यात ८३५ पैकी ६४१ म्हणजे ७६.७६% मतदान झाले आहे. पाराशिवनी तालुक्यातील […]

नागपुर विभाग पदविधर मतदार संघाच्या निवडनूकीत मंगळवार दि.१ डिसेंबर २०२० रोजी कन्हान केंद्रात ४५६ पैकी ३३९ म्हणजे ७४.३४%, पारशिवनी केंद्रात ३७९ पैकी ३०२ म्ह़णजे ७९.६८% असे दोन्ही मिळुन पारशिवनी तालुक्यात ८३५ पैकी ६४१ म्हणजे ७६.७६% मतदान झाले आहे.
पाराशिवनी तालुक्यातील कन्हान परिसरातील भाग क्रमांक २२ चे पदविधर मतदारांनी जिल्हा परिषद केद्रियं शाळा कन्हान-पिपरी खोली क्र.१ मध्ये मतदान केंद्रात असलेल्या पुरूष २४५ + स्त्री २१० व इतर १ एकुण ४५६ पैकी पुरुष १९० स्त्री १४८ व इतर १ असे एकुण ३३९ पदविधर मतदारांनी आपले मतदानचे हक्क बजावित ४५६ पैकी ३३९ म्हणजे ७४.३४% मत दान केले. पारशिवनी मतदान केन्द्र क्रमांक भाग ८ मध्ये पारशिवनी व नवेगाव खैरी परिसरातील मतदारां नी तहासिल कार्यालय खोली क्र.१ येथे असलेले पुरूष २१८ व स्त्री १६१ एकुण ३७९ पैकी पुरूष २०८ व स्त्री ९४ असे एकुण ३०२ पदविधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविल्याने एकुण ३७९ पैकी ३०२ म्हणजे ७९.६८% मतदान झाले. असे पारशिवनी तालुक्याती ल दोन्ही मतदान केंद्रात पुरूष ४६३, स्त्री ३७१ व इतर १ असे एकुण ८३५ पैकी पुरूष ३९८ स्त्री २४२ व इतर १ असे ६४१ पदविधर मतदार आपले मतदानाचे हक्क सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बजाविल्याने दोन्ही केंद्र मिळुन पारशिवनी तालुक्यात ८३५ पैकी ६४१ म्हणजे ७६.७६% मतदान झाले. यात प्रत्येक मतदान केंद्रात १ केंद्राधिकारी ३ कर्मचारी व १ पुरुष व १ महीला पोलीस कर्मचा-यानी कर्तव्य बजावित कन्हान व पाराशिवनी मतदान केंद्रासाठी दोन क्षेत्रीय अधिका-यांनी तसेच कन्हान व पारशिवनी पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक, पोलीस अधिकारी व कर्म चारी, होमगार्ड तैनात करून चौक बंदोबस्तात निवड णुक शांततेत व सुरळीत मतदान संपन्न झाले.

फोटो – १) पदवीधर मतदानाचा हक्क बजावित प सं पाऱशिवनी सभापती सौ मिनाताई प्रफुल कावळे.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *