कन्हान ला बिरसा मुंडा जयंती साजरी.कन्हान शहर विकास मंच व्दारे आयोजन.
नागपूर कन्हान : – गांधी चौक येथे कन्हान शहर विकास मंच व्दारे बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करून कन्हान पत्रकारांना दिवाळी निमित्य मिठाई पॉकेट देऊन शुभेच्छा देत बिरसा मुंडा जयंती थाटात साजरी करण्यात आली.
रविवार १५ नोव्हेंबर ला बिरसा मुंडा यांची जयंती कन्हान शहरविकास मंच व्दारे गांधी चौक कन्हान येथे पोर्णिमा दुबे यांच्या अध्यक्षेत आयोजन करून ग्रामीण पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष मा अजय त्रिवेदी यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांचा प्रतिमेस माल्यार्पण करित का र्यक्रमाची सुरवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्र संचालन व प्रास्ताविक मंच अध्यक्ष प्रविण गोडे हयांनी केले तर नगरसेविका रेखा टोहणे हयांनी बिरसा मुंडा यांच्या जिवनावर प्रकाश टाकला. याप्रसंगी ग्रामिण पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम रहाटे, कन्हा न अध्यक्ष रमेश गोळघाटे, कार्याध्यक्ष अजय त्रिवेदी, मार्गदर्शक एन एस मालविये सर, उपाध्यक्ष कमलसिंह यादव, सचिव सुनिल सरोदे, कोषाध्यक्ष रविंद्र दुपारे, सदस्य ऋृषभ बावनकर, रोहित मानवटकर आदी पत्र कारांना मंच व्दारे मिठाई पॉकेट देऊन दिवाळीच्या शुभेच्छा देत आभार व्यकत केले. याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रविण गोडे, उपाध्यक्ष ऋृष भ बावनकर, सचिव प्रदीप बावने, महासचिव संजय रंगारी, सुषमा मस्के, हरीओम प्रकाश नारायण, प्रविण माने, सतीश ऊके, सोनु खोब्रागडे सह मंच पदाधिकारी उपस्थित होते.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535