BREAKING NEWS:
महाराष्ट्र

कन्हान नदीत बुडालेल्या मुलचा मुतदेह दुस-या दिवसी मिळाला. सत्रापुरच्या करण गिरवेले यांनी वाचविले दोन मुलांचे प्राण.

Summary

नागपूर कन्हान : – पिवळी नदी नागपुर येथील तीन मुले कन्हान नदीत पोहताना बुडाले असता दोन मुलाना वाचविण्यात यश आले परंतु विनय कुशवाह चा मुतदेह दुस-या दिवसी ढिवर समाज सेवा संघटना च्या कार्यकर्त्यानी शोधुन पाण्याबाहेर काढला. शुक्रवार (दि.३०) ला दुपारी […]

नागपूर कन्हान : – पिवळी नदी नागपुर येथील तीन मुले कन्हान नदीत पोहताना बुडाले असता दोन मुलाना वाचविण्यात यश आले परंतु विनय कुशवाह चा मुतदेह दुस-या दिवसी ढिवर समाज सेवा संघटना च्या कार्यकर्त्यानी शोधुन पाण्याबाहेर काढला.
शुक्रवार (दि.३०) ला दुपारी पिवळी नदी नागपुर येथील तीन मुले कन्हान रेल्वे क्रॉसींग व चपल, बुट स्वस्त मिळतात म्हणुन दुचाकीने आले आणी खरेदी केल्यानंतर बाजुलाच कन्हान नदीत पोहण्याचा मोह न आवरल्याने तिघेही नदी पात्रात आघोळी करिता पाण्यात उतरताच खोल पाण्याचा अंदाज नसल्याने तिघेही बुडताना आरडाओरड केल्याने बाजुलाच क्रिकेट खेळणारे मुले धावुन आले. सत्रापुर येथील करण गिरवेले यांनी पाण्यात उडी घेत आयुष आशिष मेश्राम वय १५ वर्ष, व तेजस राजेश दहिवले वय १६ रा पिवळी नदी नागपुर यांना वाचविले. परंतु विनय मधुराप्रसाद कुशवाह खोल पाण्यात फसुन बुडल्याने तो मिळाला नाही. कन्हान पोलीसाना घटना स्थळी पोहचुन शोध घेत रात्र झाल्याने दुस-या दिवशी शनिवार (दि.३१) ढिवर समाज सेवा संघटनाचे अध्यक्ष सुतेश मारबते, रामचंद्र भोयर, सुधाकर सहारे, हेमराज मेश्राम, धनराज बावने, संजय मेश्राम, विजय गोंडाळे, राजु मारबते यांच्या मदतीने विनय कुशवाह चा मुतदेह शोधु पाण्या बाहेर काढुन उपजिल्हा रूग्णालय कामठी येथे उत्तरीय तपासणी करूण नातेवाईकाच्या स्वाधिन केला. ही कारवाई पो उप नि सुरजुसे, महाजन सह पोलीस कर्मचारी यांनी यश्वस्वि पार पाडली.

संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
९५७९९९८५३५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *