*ओबीसींच्या आरक्षणात कडे सरकारचे दुर्लक्ष*
जिल्हाभर आंदोलन छेडण्याचा जिल्हा युवा अध्यक्ष राहुल मुनघाटे यांचा इशारा
गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण 19 टक्के वरून केवळ 6 टक्के करण्यात आले आहे. जिल्ह्यात ओबीसी प्रवर्गाची लोकसंख्या अधिक असताना आरक्षण कपातीचा निर्णय असंविधानिक व अन्यायकारक आहे. ओबीसीचे आरक्षण पूर्ववत 19 टक्के करण्यात यावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी बांधवांचा लढा सुरू आहे. पूर्वीच्या युती शासनाने केवळ आश्वासन देऊन ओबीसींना 5 वर्ष झुलवत ठेवले, आताच्या महाविकास आघाडीच्या सरकारकडून ओबीसींना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. परंतु या सरकारचे सुद्धा गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी कडे दुर्लक्ष होत आहे.
महाविकास आघाडीच्या सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या वतीने जिल्हाभर आंदोलन छेडले जाईल असा इशारा राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष राहुल मुनघाटे यांनी सरकारला दिला आहे.
ओबीसींच्या आरक्षणाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या वतीने येत्या 26 जानेवारी रोजी साजरा होणार्या प्रजासत्ताक दिनी पालक मंत्री महोदयांना निवेदन देण्यात येणार आहे असे राहुल मुनघाटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात स्पष्ट केले आहे.
प्रा. शेषराव येलेकर
गडचिरोली, जिल्हा प्रतिनिधी