एनडब्ल्यूएम तर्फे कर्तृत्ववान महिलांचा सत्कार…….
Summary
जिल्हा नागपूर वार्ता:- नॅशनल वेब मीडियातर्फे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान नारी शक्तीचा वुमन्स एक्सलन्स अवॉर्ड देऊन सत्कार करण्यात आला. यात नारी सशक्तिकरण, समाजसेविका, उद्योजिका, शिक्षण, मीडिया, चित्रपट कलावंत या क्षेत्रातील महिलांना प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. पत्रकार क्लब ऑफ नागपूर […]
जिल्हा नागपूर वार्ता:- नॅशनल वेब मीडियातर्फे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान नारी शक्तीचा वुमन्स एक्सलन्स अवॉर्ड देऊन सत्कार करण्यात आला. यात नारी सशक्तिकरण, समाजसेविका, उद्योजिका, शिक्षण, मीडिया, चित्रपट कलावंत या क्षेत्रातील महिलांना प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. पत्रकार क्लब ऑफ नागपूर सिव्हील लाईन मध्ये आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप चे आमदार मोहन मते, तर प्रमुख अतिथी म्हणून सुनील कुहीकर, नगरसेविका प्रगती पाटील व नगरसेविका आभा पांडे उपस्थित होते.
जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित हा कार्यक्रम लॉक डाऊन मुळे नवरात्रोत्सवात घेण्यात आला. महिलांची प्रगती पंतप्रधान ते राष्ट्रपतीपर्यंत झाली असली तरी या देशात अजूनही हाथरससारखी घटनाही व्हावी, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. त्यामुळे समाजाचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे. विविध क्षेत्रात प्रगती करणाऱ्या महिलांना एकत्रित करून त्यांना वुमेन्स एक्सलन्स ॲवॉर्ड प्रदान करणाऱ्या नॅशनल वेब मीडियाचे कार्य निश्चितच स्पृहणीय आणि अभिनंदनीय म्हणावे लागेल, असे प्रतिपादन तरुण भारतचे कार्यकारी अधिकारी सुनील कुहीकर यांनी केले. नॅशनल वेब मीडियातर्फे आयोजित वुमेन्स एक्सलांस अवॉर्ड वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. दक्षिण नागपूर चे आमदार मोहन मते म्हणाले की, नारी सशक्तीकरण करण्यासाठी महिलांच्या कार्याचा गौरव होणे आवश्यक आहे. नॅशनल वेब मीडियाने याबाबत पुढाकार घेतल्याबद्दल त्याचे कौतुकच करावे लागेल. नगरसेविका प्रगती पाटील यांनीही या उपक्रमाचे कौतुक करून विविध क्षेत्रातील या महिलांनी आपल्याबरोबर तळागाळातील महिलांच्या ही समस्या सोडवून त्यांची प्रगती कशी होईल, याकडे जातीने लक्ष देणे आवश्यक आहे. नगरसेविका आभा पांडे यांनीही या नवरात्रोत्सवात नामवंत महिलांचा गौरव केल्याबद्दल नॅशनल वेब मीडिया चे आभार मानले आणि शुभेच्छा दिल्यात.कार्यक्रमाचे संचालन अंजली पारनंदीवार यांनी केले, तर प्रास्ताविक नॅशनल वेब मीडियाचे संचालक महेश श्यामकांत पात्रीकर यांनी केले. व्यासपीठावरील पाहुण्यांचा स्मृतिचिन्ह देऊन नॅशनल वेब मीडियाचे प्रशांत लांजेवार, मोनाली ढोक, कल्याणी चिटणीस यांनी त्यांचा सत्कार केला.
मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील नामवंत महिलांना प्रशस्तीपत्र व स्मृति चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
पारितोषिक प्राप्त महिला : सामाजिक कार्यकर्त्या – स्नेहल दाते, डॉ. प्रीती मानमोडे, अरुणा पुरोहित, अनुपमा प्रधान, कविता भोसले, राजेश्री बाबर. उद्योजिका : नादिया हुसैन, नीलिमा रामटेके. कलावंत : पूजा हिरवडे, वंदना व्यास, सोनिया परमार, वेदश्री खाडिलकर, अंजली पारनंदीवार, फिटनेस एक्स्पर्ट : मधुमिता गुबरे, वैद्यकीय : डॉ. कीर्ती मिरचे, डॉ. पूजा सहावे. शैक्षणिक : कानिका आनंद व विशाखा मंगदे यांचा सन्मान करण्यात आला.
(छायाचित्रात नॅशनल वेब मीडियातर्फे वुमेन्स एक्सलंस अवॉर्ड प्राप्त महिला आणि उपस्थित मान्यवर.)
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा नेटवर्क