एटीएम कार्ड अदलाबदल करून ३३ हजार रूपये काढले
नागपूर कन्हान : – खंडाळा येथील संजय दिघडे हे स्टेट बॅंक कन्हान च्या एटीएम मध्ये पैसे काढण्याकरिता गेले असता अञात दोन आरोपीने एटीएम कार्ड ची हात सपाईने अदाबदल करून बॅक खात्यातुन एटीएम मधुन ३३७०० रूपये काढुन चारसे वीसी केली.
स्टेट बॅंक कन्हान शाखेच्या एटीएम मध्ये (दि.१५) ला ५ .३० वाजता दरम्यान खंडाळा येथील संजय मधुकर दिघडे वय ४५ वर्ष हे एटीएम मधुन पैसे काढा यला आले असता त्यांच्या मागे अनोळखी दोघानी मदत करतांना त्यांच्या एटीएम कार्डची अदलाबदल करित त्यांना पैसे निघत नसल्याचे सांगितल्याने ते घरी गेल्यावर काही वेळाने १५ हजार व १० हजार आणि दुस-या दिवसी ८७०० असे एकुण ३३७०० रू काढ ल्याचा मॅसेज आल्याने बॅकेत जावुन विचारपुस केल्या वर त्याच्या एटीएम कार्डची अदलाबदल व कोड नंबर माहीत करून दोन अञात व्यकतीने त्यांचे बॅक खात्या तुन एटीएम कार्ड व्दारे चोरी केल्याने (दि.१७) ला फिर्यादी संजय दिघडे यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलीसानी अञात दोन आरोपी विरूध्द कलम ४२०, ३७ भादंवि नुसार गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535