आयुष्यमान दवाखाना व रिसर्च सेंटर व्दारे कन्हान ला कोरोना जनजागृती
नागपूर कन्हान : – आयुष्यमान मल्टीस्पेशलिटी दवाखाना व रिसर्च सेंटर कामठी आणि आरोग्य सेना च्या सौजन्याने कोविड – १९ संसर्ग रोगाविषयी प्रतिबंधक उपाय योजना विषयी चार दिवसीय जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
शनिवार (दि.१७) ला कन्हान येथील
अांबेडकर चौक, तारसा रोड चौक व शह रातील मुख्य स्थळी आयुष्मान मल्टीस्पे शलिटी दवाखाना व रिसर्च सेंटर कामठी आणि आरोग्य सेना च्या सौजन्याने कोरोना विषाणु आजाराचा प्रादुभाव रोखण्या करिता शासनाच्या नियमाची काटेकोर प णे पालन करित कोरोना आजारावर मात करून विजय मिळविण्याकरिता डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवक, पोलीस या कोरोना योध्दाना नागरिकांनी सहकार्य करून को रोना आजाराची भिती बाळगु नये तरच या आजारास हद्दपार करता येईल, अशी नागरिकांत जनजागृती करण्यात आली. ही मोहीम चार दिवस राबविण्यात येत असुन आयुष्यमान मल्टीस्पेशलिटी दवा खाना व रिसर्च सेंटर कामठी चे संचालक डॉ त्रिदिप गुहा यांच्या मार्गदर्शनात डॉक्ट र, नर्स व आरोग्य सेनाचे सेवक परिश्रम घेत आहे. या जनजागृती कार्यक्रमास कन्हान थानेदार अरुण त्रिपाठी, किशोर बेलसरे, देविदास तडस, सतीश बेलसरे आदीने सहकार्य केले.
✍🏼दिलीप भुयार
पश्चिम नागपूर प्रतिनिधी
9503309676