महाराष्ट्र

आनंदाची बातमी ! आता पासविनाही भक्तांना विठुरायाचे मुखदर्शन घेता येणार

Summary

पंढरपूर: विठ्ठल_रुक्मीणी भक्तांना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मंदिर समिती ने आनंदाची बातमी दिली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या आँनलाईन पासची सक्ती रद्द करण्यात आली असून , पासविनाही आता विठुरायाचे मुखदर्शन घेता येणार आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज यांच्या […]

पंढरपूर: विठ्ठल_रुक्मीणी भक्तांना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मंदिर समिती ने आनंदाची बातमी दिली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या आँनलाईन पासची सक्ती रद्द करण्यात आली असून , पासविनाही आता विठुरायाचे मुखदर्शन घेता येणार आहे.
मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आज मंदिर समितीची बैठक पार पडली त्यामध्ये विनापास दर्शन घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती औसेकर महाराज यांनी दिली.

कोरोना काळात सलग नऊ महिने विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंद होते त्यानंतर दिवाळी पाडव्यापासुन कोरोनाचे सर्व नियम पाळून आँनलाईन पास द्वारे विठ्ठल रुक्मिणी चे मुखदर्शन देण्याची व्यवस्था करण्यात आली होती..

दररोज पाच हजार भाविकांना मुखदर्शन देण्यात येत होते . त्यामध्ये उद्या पासून दररोज आठ हजार भाविकांना मुखदर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे..

दरम्यान आँनलाईन बुकिंग करुनही भाविक दर्शनासाठी येत नसल्याने मंदिर रिकामे राहत असल्याची बाब समितीच्या लक्षात आल्यानंतर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आँनलाईन पास काढण्याची गरज नाही असा निर्णय घेण्यात आला.

मंदिर समितीच्या या निर्णयामुळे ऐनवेळी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सोय झाली ‌आहे दरम्यान 65 वर्षांवरील वृद्ध. व्यक्ती आणि दहा वर्षांखालील लहान मुलांना मंदिरातील प्रवेश बंदी कायम ठेवण्यात आली आहे

कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात कमी होत आहे . त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढु लागली आहे . परंतु पास नसल्याने भाविकांची गैरसोय होत आहे.

भाविकांच्या मागणी नुसार मंदिर समितीने पासविना दर्शन घेण्याचा निर्णय घेतल्याने पंढरीत येणाऱ्या भाविकांना आता कोरोनाचे सर्व नियम पाळून विठुरायाचे दर्शन घेता येणार आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *